शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी सभापतींचे वाहनही ‘धक्का’ स्टार्ट

By admin | Updated: November 17, 2016 07:06 IST

सभापती भाऊसाहेब चौधरी यांना उपक्रमाकडून देण्यात आलेल्या वाहनालाही अखेरची घरघर लागली आहे.

कल्याण : एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस देखभाल-दुरूस्तीअभावी रस्त्यातच बंद पडत असल्याच्या घटना घडत असतानाच केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांना उपक्रमाकडून देण्यात आलेल्या वाहनालाही अखेरची घरघर लागली आहे. वाहन नादुरूस्त झाल्याने वारंवार बंद पडत असून धक्का दिल्यानंतरच ते सुरू होत असल्याने सभापतींचे ‘धक्कास्टार्ट वाहन’ पालिका वर्तुळात, राजकीय नेत्यांत, सत्ताधारी शिवसेनेत चर्चेचा विषय ठरले आहे.सद्यस्थितीत केडीएमटी उपक्रमात गाड्यांचा पुरेसा ताफा असला तरी २० ते २५ बस ब्रेकडाऊन स्थितीत आहेत. त्यामुळे केवळ ७५ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांपेक्षा परिवहनचा उपक्रम विविध समस्यांनी नेहमीच गाजला. देखभाल-दुरूस्तीअभावी नादुरूस्त बसचा प्रश्न गंभीर बनला. बसना आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे परिवहनचा प्रवास हा एक प्रकारे जीवघेणा ठरतो आहे. या गाड्यांच्या दुरूस्तीबाबत वारंवार चर्चा झाली. आवाज उठवण्यात आला, पण त्याबाबत कोणतीच हालचाल न झाल्याने परिवहन उपक्रम हा पालिकेसाठी पांढरा हत्ती बनतो आहे.सुसज्ज आगार आणि कार्यशाळेअभावी नादुरूस्त बसेसचे प्रमाण वाढत असताना आता परिवहन सभापतींना देण्यात आलेले वाहनही नादुरूस्त झाले आहे. हे वाहन अवघे पाच ते सात वर्षे जुने असून बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याने ‘धक्कास्टार्ट’चा प्रयोग वारंवार करावा लागतो आहे. बुधवारी सकाळीही संबंधित वाहन नादुरूस्त झाल्याची घटना केडीएमसीच्या मुख्यालयातच घडली. वाहन महापालिकेतून बाहेर काढताना बंद पडले. मुख्यालयाच्या आवारातच वाहन बंद पडल्याने बाहेरून येणारी वाहने पार्क करताना कोंडी झाली. सुरक्षा रक्षक आणि केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाहन वाटेतून बाजुला करण्यावरून प्रसंगी वादही झाले. अखेर नेहमीप्रमाणे धक्का मारूनच वाहन बाजुला करण्यात आले. या नादुरूस्त वाहनासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) ‘‘ गेल्या १५ दिवसांपासून वाहनामध्ये बिघाड होत आहे. सध्या परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे मला पुरविलेल्या सरकारी वाहनाचा जो भत्ता दिला जातो, तो जर मला मिळाला, तर मी माझ्या खाजगी वाहनाचा वापर कामकाजासाठी करू शकेन, असे मी उपक्रमाकडे स्पष्ट केले आहे. परंतु त्यावर ठोस निर्णय झालेला नाही.- भाऊसाहेब चौधरी सभापती, केडीएमटी