शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जखमी अद्याप उपचाराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:37 IST

रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे; परंतु रानसईमधील नागरिकांवर मात्र अद्याप उपचार करण्यात आले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कर्नाळा किल्ल्याच्या समोरील डोंगरावर उरण तालुक्यातील रानसई आदिवासीपाड्यांमध्ये कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. उपचार न मिळाल्याने, या दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सात जणांवरही अद्याप योग्य उपचार करण्यात आलेले नाहीत. त्या सर्वांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत, तर एखाद्याची प्रकृती खालावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु रायगड जिल्हा परिषदेचे डॉक्टर अद्याप रानसईमध्ये गेलेले नाहीत. आदिवासींनी नक्की उपचारासाठी कोठे जायचे, याविषयीही त्यांना कोणीच मार्गदर्शन केलेले नाही. दोघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचा बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मयत अनिकेत शिंगवा शिक्षण घेत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेतील व्यवस्थापनाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची कार्यवाही सोमवारीच सुरू केली आहे. मंगळवारीही विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून कोणाला काही बाधा होऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे; परंतु ज्या आदिवासीपाड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्या पाड्यांमध्ये मात्र नागरिकांना अद्याप प्रतिबंधात्मक लस देण्यात न आल्याने नाराजी वाढू लागली आहे.