शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेड फराळाला वाढली मागणी

By admin | Updated: November 2, 2015 02:06 IST

नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्या महिलांना इच्छा असूनही दिवाळीचा फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या रेडिमेड फराळाला वाढती मागणी आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबई नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्या महिलांना इच्छा असूनही दिवाळीचा फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या रेडिमेड फराळाला वाढती मागणी आहे. गेल्या काही वर्षांत तयार फराळाची वाढती मागणी पाहता बचत गट, स्वयंसेवी संस्था तसेच शहरातील महिला मंडळांनी महिनाभरापासून फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी कंबर कसली आहे. चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, शेव, करंजी, शंकरपाळे, चकली, अनारसे हे सारेच पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. फराळ बनविण्याच्या माध्यमातून कित्येक गोरगरीब महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. नोकरदार, व्यावसायिक महिलांबरोबरच सध्या गृहिणी देखील रेडिमेड फराळाची आॅर्डर देणे पसंत करत आहे. फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करून आणा, भाजणी करा, ती दळून आणा या साऱ्या भानगडीत पडण्यापेक्षा हवा तेवढा फराळ घरबसल्या आॅर्डर करून झटपट होणारी ही फराळाची सोय महिलांच्या पसंतीस पडत आहे. जिभेचे चोचले पुरविणाऱ्यांसाठी फराळामध्येही काही नावीन्यता असलेले पहायला मिळते. यामध्ये पालक शेव, बुंदी लाडू, टोमॅटो/शेजवान चकली, तिखट शंकरपाळे, मसाला शेव, मावा करंजी, बालुशाही आदी प्रकार पहायला मिळतात. चिवडा ८० रु पये किलो, शंकरपाळे ९० ते ११० रु पये किलो, १२ चकल्यांचे पाकीट ८० रु पये, अनारसे १७० रु पये किलो, करंजी १२० ते १५० रु पये किलो, शेव ७० ते ९० रु पये किलो, पातळ पोह्याचा चिवडा ६० रु पये किलो या दरांमध्ये फराळांचे पाकीट उपलब्ध असून एकत्रितरीत्या सर्व फराळासाठी ८०० ते ९०० रु पये आकारले जातात.