शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या वित्त आॅनलाइन प्रणालीत होणार सुधारणा

By admin | Updated: May 6, 2017 06:13 IST

राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आॅनलाइन प्रणालीतील बिम्स, ग्रास, सेवार्थ, निवृत्तीवेतन, बिलपोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आॅनलाइन प्रणालीतील बिम्स, ग्रास, सेवार्थ, निवृत्तीवेतन, बिलपोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी आदी संगणकीय आॅनलाइन प्रणालीत नवीन पायाभूत सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांनंतर ही प्रणाली गतिमान होऊन, वेतन आणि निवृत्तीवेतन मिळण्यातील विलंब दूर होऊ शकणार असल्याची माहिती रायगड जिल्हा कोषागार अधिकारी के. जी. कर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. राज्यातील सर्व कोषागार कार्यालयाचे संगणकीकरण २०१२ मध्ये झाले, त्यानंतर प्रणालीमधील नवीन सुधारणा प्रथमच होत आहे. विद्यमान वित्त प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम करायचे असल्याने काही काळ ही प्रणाली बंद राहणार असल्याने वेतनदेयके, बिम्स प्रणालीतून निघणारे प्राधिकारपत्रे, बिलपोर्टल प्रणालीद्वारे तयार होणारी देयके जिल्हा कोषागारात लवकरात लवकर सादर करावीत. जेणेकरून कोषागारात सादर केलेली देयके पारित करून विनाविलंब वेतनाचे प्रदान करणे सोयीस्कर होईल, असे कर्वे यांनी सांगितले. हस्तलिखित पद्धतीने असलेल्या चलनांना पूर्वीची पद्धत उपरोक्त कालावधीत लागू राहणार आहे. मुद्रांकाची विक्री हस्तलिखित चलनांच्या अनुषंगाने करण्यात येईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी के. जी. कर्वे यांनी स्पष्ट केले आहे.प्रणाली बंद राहण्याचा कालावधीबिम्स, सेवार्थ (एनपीएस, कर्जे व अग्रीम, गट ड भविष्य निर्वाह निधी), निवृत्तीवेतन, बिल पोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी या प्रणाली शनिवारी, ६ मे २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून गुरु वार, ११ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. ग्रास ही प्रणाली शुक्र वार, १२ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून रविवार, १४ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.