शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे हनुमाननगरमध्ये तुंबलेल्या गटारामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:35 IST

घाणीचे साम्राज्य : स्वच्छता अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

नवी मुंबई : केवळ शहरात आणि राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात स्वच्छतेचे शहर म्हणून तिसरा क्रमांक मिळविणारी नवी मुंबई महापालिका आहे. मात्र, या स्मार्ट सिटीत तुर्भे परिसरातील हनुमाननगरची पार दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहेत. संपूर्ण कचरा रस्त्यावर येऊनही तुर्भे विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाक-तोंड दाबून घाणीच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. विद्युत केबलची गंभीर समस्या असल्याने, नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तुर्भे नाका येथील हनुमाननगरमधील अनेक ठिकाणी उघडी गटारे असल्यामुळे, या गटारातील दूषित सांडपाणी अनेकदा नागरिकांच्या घरात शिरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारांची वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्याने, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचे खोपडे यांनी सांगितले. विद्युत खांबावरील उघड्या विजेच्या तारांनी अक्षरश: झाडांच्या वेलींप्रमाणे विळखा घातलेला आहे. त्यामुळे रहिवाशांना रात्री अपरात्री जीव मुठीत धरून येथून चालावे लागते.

पालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे झोपडपट्टी परिसर म्हणजे अत्यंत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य. अनेक ठिकाणी गवत वाढलेले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक पटकावलेल्या या महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्षात या नगरची पाहणी केल्यास स्वच्छता विभागाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कचराकुंडी भरून कचरा बाहेर पडूनही उचलण्यात आला नसल्याची तक्रार असून, या कुंडीबाहेर मेलेली कुत्री आणि डुकरांचा वावर दिसून येत आहे. येथील नियोजित उद्यानाच्या मोकळ्या भूखंडासमोर अक्षरश: कचºयाचे डम्पिंग झाले आहे. त्यामुळे या परिसराची दयनीय अवस्था झाली आहे.तुर्भे परिसरातील हनुमाननगरात कचरा, दूषित सांडपाणी, गटारे याबाबत त्वरित पाहणी करण्यात येईल. त्या संदर्भात संबंधित अधिकाºयांना सूचित करण्यात येईल आणि कचरा उचलून साफसफाई करण्यात येईल.- डॉ.बाबासाहेब राजळे,उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, मुख्यालय

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई