शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलांना प्रवेश द्या

By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST

वाशीमधील नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा-सुविधा केंद्राच्या वतीने शहरातील विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

प्राची सोनवणे, नवी मुंबईवाशीमधील नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा-सुविधा केंद्राच्या वतीने शहरातील विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी हजारो मुले प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच पालिका शाळा, तसेच खाजगी शाळांनी आपल्या शाळेत या मुलांना प्रवेश देऊन सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केंद्राच्या संचालिका वर्षा भगत यांनी केले आहे. ईटीसी केंद्रात सध्या ४७७ मुले प्रशिक्षण घेत आहेत. अपंग प्रवर्गातील १२०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या प्रवेश मर्यादेच्या अधीन राहूनच केंद्रामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे सर्वच मुलांना प्रवेश देणे शक्य होत नाही. या केंद्रात बहुअपंगत्व आणि मतिमंद विभागातील मुलांची संख्या जास्त आहे. नवी मुंबई परिसरातील शाळांमध्ये किमान एका तरी विशेष मुलाला प्रवेश मिळावा यासाठी केंद्राच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. ईटीसी केंद्रात आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी प्रवेशासाठी पालकांची रांग लागते. आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे तसेच महापौर सागर नाईक यांनी या केंद्रासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे. विशेष मुलांना जवळपासच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी केंद्राच्या वतीने पालकांना तसेच शाळेला पुरेपूर सहकार्य केले जाते. शाळेतील शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची सोय या केंद्रामार्फत केली जाते. तसेच पालकांसाठीही विविध उपक्रम राबविले जातात. १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षणाची सोय केलेली आहे. या उपक्रमांतर्गत सध्या १२ मुले प्रशिक्षण घेत आहेत. पालक आणि मुलांना एकत्रितपणे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यानंतर घरच्या घरी देखील मुलांचा विकास होऊ शकतो. यामध्ये फिजियोथेरेपीचा समावेश असतो. तसेच वाचा, श्रवण, बौद्धिक क्षमता, शैक्षणिक पातळी, व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण देऊन कमीत कमी कालावधीत मुलांचा जास्तीत जास्त विकास केला जातो. खाजगी संस्थांच्या वतीने अशा विशेष मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी एका सेशन्समागे २७५ ते ३०० रुपयांचा दर आकारला जातो. ईटीसी केंद्रात तज्ज्ञांच्या मदतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येते.