शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये गांजा पकडला

By admin | Updated: March 17, 2017 05:53 IST

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील उरण दादरपाडा येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत, सुमारे दीड किलो वजनाचा गांजा

उरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील उरण दादरपाडा येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत, सुमारे दीड किलो वजनाचा गांजा व रोख रक्कम असा एकूण १५,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासी पोलीस अधिकारी शेलार यांनी दिली. अमली पदार्थांच्या विळख्यात नवी तरु णाई दिवसेंदिवस जात आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. यामध्ये सातत्याने खबऱ्यांकडून माहिती घेत धाडसत्र सुरू आहे. उरण जेएनपीटी परिसरात परप्रांतीयांनी या धंद्यात बस्तान मांडले असल्याचे बोलले जाते. मात्र, आता स्थानिकही सहभागी असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार व पोलीस नाईक जाधव, भालेराव, पो.हवा. पिरजादे, चालक सांगोलकर असे पथक बुधवार, १५ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजताचे सुमारास संशयित ठिकाणी पोहोचले. आधीच सापळा रचून ठेवला असल्याने सावज अलगद फसले. चिर्ले-दिघोडे मार्गावरील दादरपाडा या गावातील कमलाकर गायकवाड (५९, रा. दादरपाडा-दिघोडे ता. उरण) याच्या घरातून १ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ चोरून विक्र ी करत असल्याचे पथकास आढळले. या व्यक्तीकडे असलेले अमली पदार्थ व रोख रक्कम ११९० रुपये असा एकूण १५,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलीस नाईक राजेश गाढवे (अमली पदार्थ विरोधी पथक नवी मुंबई) यांनी उरण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, आरोपी विरोधात एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट सन १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यात आरोपीला पोलीस कस्टडी दिली असून, गुरु वारी उरण न्यायालयात हजर करत रिमांड घेणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे तपासी अंमलदार अमित शेलार यांनी दिली. रायगडचा गांजामाफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीचे मोठे नेटवर्क आहे. बऱ्याच वर्षांपासून या धंद्यात असलेला कमलाकर पोलिसांना तुरी देत होता. स्थानिक असल्याने जेएनपीटी द्रोणागिरी परिसरात त्याने चांगला जम बसवला होता. (वार्ताहर)