शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर पूर्ण वेळ प्रशासक

By admin | Updated: March 17, 2017 06:00 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून सतीश सोनी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. दोन वर्षांनंतर पूर्ण वेळ प्रशासक मिळाला असल्याने

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून सतीश सोनी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. दोन वर्षांनंतर पूर्ण वेळ प्रशासक मिळाला असल्याने अनागोंदी थांबून एपीएमसीच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासक पदावर मनोज सौनिक यांची नियुक्ती केली होती. पण सौनिक यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातून एकच दिवस प्रत्येक बाजार समितीमध्ये येत होते. पूर्ण वेळ प्रशासक नसल्याने कामकाज गतीने होत नव्हते. यामध्येच मसाला मार्केटमधील एका बड्या कंपनीला सेसमधून दिलेली सूट. डॉग स्कॉड घोटाळा, दिवसेंदिवस कमी होत चाललेला महसूल व इतर अनागोंदी कारभारामुळे संस्थेची बदनामी होवू लागली होती. यामुळे पूर्ण वेळ अधिकारी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. सतीश सोनी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यामुळे आता एपीएमसीच्या कामकाजामध्ये शिस्त येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सतीश सोनी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. या वेळी माजी सचिव सुधीर तुंगार, विद्यमान सचिव शिवाजी पहिनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचारी व व्यापारी संघटनांनी सोनी यांचे स्वागत केले. प्रशासकांनी पहिल्याच दिवशी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून बाजार समितीच्या कामकाजाविषयी आढावा घेतला असून त्यांच्या कार्यपद्धतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)