शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

करंजा लॉजिस्टिकविरोधात मोर्चा

By admin | Updated: March 21, 2017 02:05 IST

करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स बंदराच्या विरोधात उरण तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी प्रकल्पावरच विविध प्रलंबित

उरण : करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स बंदराच्या विरोधात उरण तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी प्रकल्पावरच विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या संतप्त मोर्चेकऱ्यांनी प्रकल्पाचे कामकाज काही तास बंद पाडले. या मोर्चात स्थानिक मच्छीमारांसह सुमारे ४०० नागरिक सहभागी झाले होते.करंजा टर्मिनल लॉजिस्टिक्सच्या बंदराचे काम सुरू आहे. मात्र या बंदर उभारणीच्या कामामुळे मच्छीमार व्यवसायावरच विपरीत परिणाम झाला आहे. स्थानिकांना रोजगारापासूनही वंचित ठेवले आहे. त्यामुळे करंजा परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. करंजा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी, स्थानिकांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, करंजा टर्मिनल लॉजिस्टिक्ससाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला उर्वरित शेतकऱ्यांना पूर्णपणे देण्यात यावा, आदी प्रलंबित मागण्यांसाठी उरण तालुका भाजपाच्या वतीने सोमवारी प्रकल्पावरच मोर्चा काढण्यात आला. कासवले- हनुमान मंदिर ते करंजा लॉजिस्टिक असा दीड किमी अंतरापर्यंत तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात चाणजे, राजिप सदस्या रीना घरत, पं. स. सदस्य दीपक चिवेलकर, चाणजे ग्रा. पं.चे माजी सरपंच जितेंद्र घरत, करंजा मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा आदींसह नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी प्रकल्पाचे कामकाज बंद पाडताच वठणीवर आलेल्या करंजा टर्मिनल लॉजिस्टिकच्या अधिकाऱ्यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाची भेट घेवून चर्चा केली. चर्चेत प्रकल्प अधिकारी नटराजन यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची ठोस पूर्तता न केल्यास प्रकल्पच बंद पाडण्याचा इशाराही भाजपाने प्रकल्प अधिकाऱ्यांना दिला. (वार्ताहर)