शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांना जुगार अड्ड्याचे स्वरूप

By admin | Updated: September 23, 2015 04:18 IST

गणेशोत्सव मंडळात जुगार खेळण्यावर पोलीसांनी बंदी घालूनही जागराणाच्या नावाखाली अनेक मंडळात जुगार खेळला जात आहे

नवी मुंबई : गणेशोत्सव मंडळात जुगार खेळण्यावर पोलीसांनी बंदी घालूनही जागराणाच्या नावाखाली अनेक मंडळात जुगार खेळला जात आहे. अशा तिन मंडळावर पोलीसांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून ५३ जुगारींना अटक केली आहे.नवी मुंबई पोलीसांनी मागील चार महिण्यात शहरातील जुगार अड्डे बंद करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अनेक जुगार अड्यांवर कारवाया केलेल्या आहेत. अनेक वर्षापासून ठिकठिकाणी चालणाऱ्या अड्यांवर कारवाया होवू लागल्याने अनेक जुगार चालक भुमीगत झाले आहेत. पोलीसांच्या या भुमीकेचे महिला वर्गाकडून आभार व्यक्त होत आहे. जुगार बंद झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचले आहेत. कारवाईच्या भीतीने अड्डे बंद असल्याने जुगार खेळण्याचे आदीन झालेल्यांना शहरात पर्याय उरलेला नाही. मात्र सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा आसरा काही जुगारी घेत आहेत. गणेशोत्सव मंडळामध्ये जागरणाच्या नावाखाली रात्रभर जुगार खेळला जात आहे. त्याठिकाणी रातोरात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिवसा खुर्ची उचलायलाही कार्यकर्ता नसलेल्या अशा काही मंडळात रात्री मात्र जुगारासाठी गर्दी जमलेली असते. त्यामुळे अशा काही गणेशोत्सव मंडळांना जुगार अड्याचे स्वरुप आले आहे.उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक रोहन बगाडे यांच्या पथकाने सोमवारी रात्री अशा तिन मंडळांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये तुर्भे सेक्टर २१ येथील शिवराजे प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळात चाललेला जुगार उघड झाला. त्याठिकानी मंडळाच्या पदाधीकारयांसह जुगार खेळणारया २७ जणांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. तर जुगारासाठी मांडलेली १ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम त्याठिकाणावरुन जप्त केली आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे सेक्टर १६ येथील मिनी मार्केटमधील फ्रेंड्स ग्रुप गणेशोत्सव मंडळावर पथकाने छापा टाकला. त्याठिकाणी जुगार खेळणारया १७ जुगारींवर कारवाई करुन जुगारासाठी मांडलेली २८ हजार ९५० रुपयांची रक्कम जप्त केली. हे मंडळ राजकीय पक्षाशी संबंधीत असून मंडळाच्या अध्यक्षाची पत्नी महापालिका निवडणुकीत उमेदवार होती.पहाटेच्या सुमारास या पथकाने नेरुळ परिसरात धडक देवून सेक्टर १० मधील एल.आय.जी कॉलनीच्या जागृती गणेशोत्सव मंडळावर कारवाई केली. त्याठिकाणी जुगार खेळणाऱ्या ९ जुगारींवर कारवाई करुन ५५ हजार ४१० रुपयांची रोकड जप्त केली आहे. एका लोकप्रतीनिधीच वास्तव्य असलेल्या सोसायटीचे हे गणेशोत्सव मंडळ आहे. एका रात्रीत केलेल्या या तिन कारवायांमध्ये एकून ५३ जणांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.या मंडळांवर कारवाई झालेली असली तरी शहरातील अशा इतरही काही मंडळांमध्ये रात्रीच्या वेळी जागरणाच्या नावाखाली जुगाराचे डाव मांडले जात आहेत. त्यामुळे प्रबोधनाचा वारसा असलेल्या गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे.