शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोविरोधात लढा तीव्र करणार

By admin | Updated: August 13, 2015 23:21 IST

सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकामाच्या तोडक मोहिमेला खारघरमधून तीव्र विरोध होत आहे. याविरोधातील लढा आणखी तीव्र करून प्रकल्पग्रस्तांची बाजू सिडकोसमोर मांडू

पनवेल : सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकामाच्या तोडक मोहिमेला खारघरमधून तीव्र विरोध होत आहे. याविरोधातील लढा आणखी तीव्र करून प्रकल्पग्रस्तांची बाजू सिडकोसमोर मांडू, असा निर्धार शेकापने गुरु वारी खारघरमध्ये आयोजित केलेल्या निषेध मोर्चात केला. बुधवारी खारघरमधील मुर्बी गावातील दत्तू जानू ठाकूर या प्रकल्पग्रस्ताचे गरजेपोटी बांधलेले घर सिडकोने जमीनदोस्त करून शेकाप नेते बाळाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थांना अटक केली होती. त्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते परिसरातील महिला, युवकांचा मोठा सहभाग होता. शेकापने छेडलेल्या या मोर्चाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना आदी पक्षांनी पाठिंबा दर्शविला. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वाढत आहे. मात्र सिडकोकडून केवळ प्रकल्पग्रस्तांच्याच घरांवर कारवाई करण्यात येत आहे, असा प्रश्न यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरही अनेकांनी टीका केली. माजी आमदार विवेक पाटील यांनी सिडकोविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याची गरज असल्याचे सांगत प्रत्येक गावांमध्ये बैठका घेऊन सिडकोविरोधात एकवटण्याची गरज असल्याचे सांगितले. ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत त्यांनी प्रकल्पग्रस्तांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल कार्यालयामध्ये आपली कागदपत्रे जमा करावीत, ती कागदपत्रे पडताळून सिडकोला त्याची माहिती देऊन सिडकोसमोर आपली बाजू मांडली जाईल, असे स्पष्ट केले. शेतकरी कामगार पक्षासमोर सध्या एकच कार्यक्र म असून प्रकल्पग्रस्तांची घरे वाचविणे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खारघर सेक्टर २० मधील या निषेध मोर्चामध्ये शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, सुनील सावर्डेकर आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)