शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला? रस्ता झाला खड्डेमय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 3:25 AM

नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गाची गेल्या वर्षी मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुरु स्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबई : शहरातील पाम बीच मार्गाची गेल्या वर्षी मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुरु स्ती करण्यात आली आहे. या प्रणालीच्या वापरानंतर अवघ्या वर्षभरात पाम बीच मार्ग ठिकठिकाणी खडबडीत झाला असून, खड्डेही पडले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला की काय? असा सवाल व्यक्त होत आहे.सिडकोने निर्मिती केलेल्या पाम बीच या मार्गाचे हस्तांतर २००७ साली पालिकेकडे केले आहे. २००७ साली हस्तांतराच्या वेळी या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते, यासाठी सिडकोने जवळपास १४ कोटी रु पये खर्च केले होते. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. तसेच रस्त्यावरील डांबर ठिकठिकाणी उखडल्यामुळे रस्ता खडबडीत झाला होता. या रस्त्याला पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असल्याने तसेच या कामासाठी लागणारा वेळ यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होणार होती. पैशाची, वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक तंत्रप्रणालीसाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये रस्त्याचे खोदकाम न करता जुन्या रस्त्यावरच डांबरीकरण, रस्त्याची उंचीदेखील जास्त वाढत नाही. रस्त्यावर मशिनच्या दाबामुळे जुना रस्ताही भरून निघतो. प्रदूषण होत नाही अशा विविध उल्लेखनीय बाबी असल्याने या तंत्रप्रणालीचा वापर करून मार्गाची दुरु स्ती करण्यात आली होती. या मार्गाच्या कामानंतर रस्त्याला किमान सात वर्षे कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगण्यात आले होते; परंतु काम झाल्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या पावसातदेखील मार्गावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. या वर्षीही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्ता खडबडीत झाला आहे. पाम बीच मार्गावर नेरु ळ जंक्शन येथील वाशीकडे जाणाऱ्या आणि येणाºया अशा दोन्ही मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्ता खडबडीतही झाला आहे. महापालिकेने शहरात पहिल्यांदाच राबविलेला मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा प्रयोग फसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई