फ्लेमिंगो अधिवासासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार, जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त मूकमोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:10 IST2026-05-10T14:08:35+5:302026-05-10T14:10:32+5:30

एनआरआय वेटलँड्स ते डीपीएस फ्लेमिंगो लेक दरम्यानच्या या आंदोलनात वेटलँड्सवरील अतिक्रमणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Environmentalists rally for flamingo habitat, hold silent march on World Migratory Bird Day | फ्लेमिंगो अधिवासासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार, जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त मूकमोर्चा

फ्लेमिंगो अधिवासासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार, जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त मूकमोर्चा

नवी मुंबई : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त नेरूळ परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवास संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमींनी शनिवारी मूकमोर्चा काढला. एनआरआय वेटलँड्स ते डीपीएस फ्लेमिंगो लेक दरम्यानच्या या आंदोलनात वेटलँड्सवरील अतिक्रमणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध पर्यावरण संघटना, नागरिक व पक्षीप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. ठाणे जिल्हा वेटलैंड समितीने काही तलावांना अधिकृत वेटलैंड दर्जा नाकारल्याबद्दल कार्यकर्त्यानी चिंता व्यक्त केली.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, 'पक्षीपूरक शहरे आणि समुदाय निर्माण करणे' या यंदाच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आला.. वेटलँड्स वाचवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असून, जनजागृती मोहिमा राबवून अधिकाधिक नागरिकांना या प्रश्नाशी जोडले जाईल, असे स्पष्ट केले.

नैसर्गिक प्रवाह रोखला; सिडकोवर आरोप

डीपीएस फ्लेमिंगो लेकमधील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्याचा आरोप नवी मुंबई पर्यावरण संरक्षण संस्थाचे संदीप सरीन यांनी सिडकोवर केला.

तलावातील शेवाळ, सांडपाणी आणि सेंद्रिय कचऱ्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली असून, त्यामुळे फ्लेमिंगो तलावावर उतरणे टाळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅग्रोव्हज फोरमच्या रेखा सांखला यांनी वनविभागाच्या संवर्धन प्रयत्नांचे कौतुक केले, मात्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली.

खारघर वेटलँड्स अँड हिल्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी वेटलँड्स ही नैसर्गिक स्पंजप्रमाणे काम करत असून, ती नष्ट झाली तर पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा निचरा न होता पूरस्थिती अधिक गंभीर बनेल, असा इशारा दिला.

Web Title : विश्व प्रवासी पक्षी दिवस पर फ्लेमिंगो आवास के लिए पर्यावरणविदों का प्रदर्शन

Web Summary : नवी मुंबई में पर्यावरणविदों ने फ्लेमिंगो आवासों पर अतिक्रमण के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। उन्होंने ठाणे वेटलैंड समिति द्वारा कुछ झीलों को वेटलैंड का दर्जा देने से इनकार करने की आलोचना की और CIDCO पर प्राकृतिक जल प्रवाह को अवरुद्ध करने, पानी की गुणवत्ता को नुकसान पहुंचाने और फ्लेमिंगो आबादी को प्रभावित करने का आरोप लगाया। कार्यकर्ताओं ने चेतावनी दी कि वेटलैंड्स का विनाश गंभीर बाढ़ का कारण बनेगा।

Web Title : Environmentalists Protest for Flamingo Habitat on World Migratory Bird Day

Web Summary : Environmentalists in Navi Mumbai protested against encroachment on flamingo habitats. They criticized the Thane Wetland Committee's denial of wetland status to some lakes and accused CIDCO of blocking natural water flow, harming water quality and impacting flamingo populations. Destruction of wetlands will cause severe flooding, warned activists.