शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

११ वर्षांच्या दिव्यांशु सिंहने लिहिलेले इंग्रजी नाटक रंगभूमीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:42 PM

सेव्हन लेटर्स आॅफ यु.एफ.ओ.: नाटक बच्चेकंपनीच्या भेटीला

मुंबई : आजकालची लहान मुले वाचन करत नाहीत, अशी नेहमी तक्रार केली जाते. मात्र अंधेरीतील दिव्यांशु सिंह या ११ वर्षांच्या मुलाने वाचनाच्या गोडीमुळे एक नाटक लिहून काढले आहे. ‘सेव्हन लेटर्स आॅफ यु.एफ.ओ.’ हे बालनाटक आता लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. दिव्यांशु अंधेरी पश्चिम येथील भवन्सच्या ए.एच. वाडिया हायस्कूलमध्ये आठवीत शिकत आहे.

राम आणि शाम हे विरुद्ध प्रवृतीचे दोन विद्यार्थी योगायोगाने एका वेड्या शास्त्रज्ञाबरोबर गुप्त कामगिरीसाठी एकत्र येतात. ते त्या शास्त्रज्ञासोबत दिल्लीला जातात व तिथे त्यांची डॉ. डेव्हिड यांच्याशी भेट होते. त्यांचा असा विश्वास आहे की, परग्रहावरून येणारे एलियन हे अनेक वर्षांपासून पृथ्वीचे निरीक्षण करत आहेत. ते त्यांचे मेसेज डिकोड करून पृथ्वीवर ह्ल्ला करणार आहेत, हे त्यांच्या लक्षात येते. ते पृथ्वीला वाचवतात का? डॉ. फ्रँकेनस्टाईन आणि डॉ. डेव्हिड एलियनची भाषा डिकोड करू शकतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘सेव्हन लेटर्स आॅफ यु.एफ.ओ.’ या इंग्रजी बालनाटकातून मिळणार आहेत.दिव्यांशुला लहानपणापासूनच वाचनाची गोडी होती. त्यामुळे त्याने कॉमिक्सपासून सुरुवात करून रामायण, महाभारतही वाचून काढले. पुढे तो रॉबिनहूडकडून सायन्स फिक्शनकडे वळला. त्याने भारत सासणे यांच्या बालकथाही वाचल्या. त्यांच्या ‘राम शाम आणि परग्रहावरचा माणूस’ या कथेने त्याला आकर्षित केले. पुढे सासणे यांची गाठ पडल्यावर त्यांनी त्याला या कथेवर नाटक होऊ शकेल असे सुचविले. २०१९च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दिव्यांशुने हे बालनाट्य लिहून काढले.

कराटे मास्टर, एक शेरलॉक होम्सचा फॅन, एक वेडा शास्त्रज्ञ, एक एलियनवर संशोधन करणारा संशोधक, एक निवृत्त लष्कर अधिकारी आणि एक कामातून गेलेला पत्रकार, असे सगळे मिळून एका गुप्त कामगिरीवर गेले. व त्यांनी पराग्रहावरून आलेल्या एलियनपासून पृथ्वीला कसे वाचवले? हे सांगणारे हे नाटक आहे. पुण्याच्या ‘बुक गंगा’ या प्रकाशनाने हे नाटक प्रकाशित केले आहे. २०२१च्या मे मध्ये हे नाटक रंगमंचावर येणार असून, या नाटकाचा मराठी, हिंदी आणि कानडी अनुवाद उपलब्द होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई