शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

खाणकामामुळे ओवे कॅम्पमधील घरांना तडे

By admin | Updated: January 11, 2016 02:10 IST

कोयना प्रकल्पग्रस्तांचे १९६२ साली खारघरमधील ओवे गावात पुनर्वसन करण्यात आले. कालांतराने सिडकोने या परिसराचा ताबा घेतला असला तरी आजही ओवे कॅम्प ही वसाहत अनेक सुविधांपासून वंचित आहे.

वैभव गायकर, पनवेलकोयना प्रकल्पग्रस्तांचे १९६२ साली खारघरमधील ओवे गावात पुनर्वसन करण्यात आले. कालांतराने सिडकोने या परिसराचा ताबा घेतला असला तरी आजही ओवे कॅम्प ही वसाहत अनेक सुविधांपासून वंचित आहे. सिडकोने नवनवे नोड वसवले असून बांधकामाच्या गरजा लक्षात घेऊन याठिकाणी खाणकामाला परवानगी दिली आहे. मोठमोठे सुरुंग लावून स्फोट करण्यात येत असल्याने ओवे कॅम्पमधील रहिवासी भीतीच्या छायेत वावरत आहेत. घरांनाही तडे गेल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रशासनही याप्रकरणी डोळेझाक करीत असून त्यामुळे खाणकाम व्यावसायिकांवर वचक नसल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करीत आहेत. ओवे कॅम्पची लोकसंख्या जवळपास २५०० इतकी आहे. सध्या तीन ते चार ठिकाणी खाणकाम सुरू आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. खाणकामातून उत्खनन केलेला मालाची शाळा असलेल्या रस्त्यावरूनच वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शिवाय माती, दगड, मुरुम वाहून नेला जात असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरते. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. दररोज ओवे गावातील खाणीत दोन ते तीन वेळा सुरुंग लावून स्फोट घडविले जातात. सुरुंग स्फोटामुळे लहान मुले, वयोवृध्दांना त्रास होतो. अनेकदा घरातील भांडी पडतात. त्यामुळे सरकारने याप्रकरणी लक्ष घालून या त्रासातून आमची सुटका करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी जनाबाई रेवने यांनी केली आहे. खाणकाम व्यावसायिकांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे येथील रहिवासी राम जाधव यांनी सांगितले.