शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आमिषाला बळी पडू नका

By admin | Updated: July 8, 2017 05:55 IST

लंैगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी करणे, हे सर्वस्वी स्त्रियांच्या हातात आहे आणि त्यासाठी आपण आपली

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : लंैगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी करणे, हे सर्वस्वी स्त्रियांच्या हातात आहे आणि त्यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असा महत्त्वाचा सल्ला कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शालेय विद्यार्थिनींना त्यांच्याशी सुसंवाद करताना दिला.महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, रोज कुठे ना कुठे अत्याचाराची घटना घडल्याची बातमी ऐकायला येत आहे. याबाबत महिलांनी विशेष काळजी घ्यावी, विशेष करून शालेय विद्यार्थिनींनी याबाबत काय दक्षता घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी येथील कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक तानवडे यांनी मुलींनी स्वत:चे रक्षण केले पाहिजे, मुलांच्या बदलणाऱ्या मानसिकतेला एक मुलगी म्हणून कसे सामोरे जावे, तसेच आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले चारित्र्य संपन्न जीवन कसे जगावे? याविषयी मार्गदर्शन केले. स्त्रियांवरील वाढते अत्याचार कमी करणे हे सर्वस्वी स्त्रियांच्या हातात आहे, त्यासाठी कशी काळजी घ्याल? कसे वागाल? या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला. या वेळी शहरात फिरणारे दामिनी पथक काय कार्य करत आहेत, याची माहिती दिली. दामिनी पथकातील वैदेही सावंत यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधताना, मी कोणत्याही वेळी तुमच्या मदतीला धावून येईन, असा शब्द दिला.शाळेच्या मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांनी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचे स्वागत केले. श्रद्धा मुंढेकर यांनी आभार मानले. या वेळी वृषाली यादव, स्नेहा गाढे, मेघा पिंगळे, प्रेमा पिंगळे, स्मिता गणवे, आरती कोकरे, माधुरी देशमुख, वृषाली माळी, सुषमा सुपे, सुप्रिया भासे, अर्चना भुसाळ आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.