शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग वधू-वर : सानपाड्यामध्ये विशेष विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:54 IST

वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून

नवी मुंबई : वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून वधू - वरांना आशीर्वाद देण्यासाठी शहरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.वात्सल्य ट्रस्ट अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. अनाथ मुलांचा सांभाळ, वृद्धाश्रम व विविध प्रशिक्षण शिबिरांचे संस्थेच्यावतीने आयोजन केले जाते. गतिमंद असलेल्या शीतलचाही ट्रस्टच्यावतीने लहानपणापासून सांभाळ केला जात आहे. ट्रस्टमध्ये वाढलेल्या मुला - मुलींना चांगले स्थळ मिळावे यासाठी पदाधिकारी पाठपुरावा करत असतात. शीतलचा विवाह वसई येथील मूकबधिर असलेल्या अंबरीश या तरूणाशी निश्चित करण्यात आला. नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेलर्स असोसिएशन, दि कंझुमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. ७ मे रोजी सानपाड्यामधील केमिस्ट भवनमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.विशेष मुलांच्या या विवाहासाठी शहरातील विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे गणेश परळीकर, गौरीशंकर ब्याळे, मनपाच्या उपआयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, दिलीप बोºहाडे, बाळासाहेब कांडपिळे, वात्सल्य ट्रस्टचे सानपाडा प्रकल्प सल्लागार लक्ष्मण नलावडे, विजय ताम्हाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्नNavi Mumbaiनवी मुंबई