शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट वेतनकपातीमुळे नाराजीचा सूर, मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 00:57 IST

अडीच महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन असल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. याचा परिणाम सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना करण्यात आले आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी नवी मुंबई पोलीसदेखील योगदान देणार आहेत. त्याकरिता अधिकारी व कर्मचारी यांचे दोन दिवसांचे वेतन कापले जाणार आहे; परंतु हा निर्णय ऐच्छिक असतानाही सरसकट कपात केली जाणार असल्याने नाराजीचा सूर पोलिसांकडून व्यक्त होत आहे.अडीच महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन असल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. याचा परिणाम सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना करण्यात आले आहे. त्यात पोलिसांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांकडूनही मुख्यमंत्री साहाय्यता निधी दिला जाणार आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असून येत्या पगारातून ही रक्कम कपात केली जाणार आहे. मुख्यालय उपायुक्त शिवराज पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी योगदान ऐच्छिक असतानाही नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचे सरसकट दोन दिवसांचे वेतन कापले जाणार आहे. त्याद्वारे जमा होणारी एकत्रित रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिली जाणार आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सुमारे ४५०० अधिकारी व कर्मचारी आहेत. त्या सर्वांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सरसकट वेतनकपातीच्या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे; परंतु सरसकट वेतन कपातीच्या निर्णयाची नाराजीनवी मुंबई पोलीस व्यक्त करतआहेत.अगोदरच शासनाने वेतनात १५ ते ५० टक्के पर्य$ंतची कपात केली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रजा रद्द करून पोलिसांना दिवसरात्र बंदोबस्त करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे पोलिसांपुढेही कौटुंबिक अडचणी आहेत.- अडीच महिन्यांच्या बंदोबस्त कालावधीत सुमारे २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काहींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशात पगारावर आलेल्या संकटामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडू शकते. यामुळे शासनाची तिजोरी भरण्यासाठी पोलिसांच्या खिशाला कात्री न लावण्याची विनंती पोलिसांकडून होत आहे.