शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांकडून १८ कोटी वसूल करण्याचे आदेश, एमआयडीसीला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:26 IST

तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका प्रलंबित आहे.

पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका प्रलंबित आहे. या याचिकेमुळे विविध घडामोडी तळोजा एमआयडीसीमध्ये पाहावयास मिळत आहेत. या विषयाच्या अनुषंगानेच सर्वोच्च न्यायालयाने ९०० पैकी ३२४ कारखानदारांकडून १८ कोटी रुपये लवकरात लवकर वसूल करण्याचे आदेश एमआयडीसी प्रशासनाला दिले आहेत.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नवीन जादा क्षमतेचे सीईटीपी प्रकल्प उभारण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. रासायनिक कारखान्यांकडून १८ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश एमआयडीसीला देण्यात आले होते. मध्यंतरी तळोजा एमआयडीसीमधील ५० टक्के पाणीकपातीविरोधात कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने कारखानदारांना दिलासा देत पाणीकपात रद्द केली होती. मात्र, कारखानदारांनी एमआयडीसीकडे १८ कोटी रुपये भरले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने ३२४ कारखानदारांना तीन आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. याकरिता एमआयडीसीला तीन आठवड्याची मुदत दिली आहे. ८ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. ३२४ कारखानदारांपैकी काही कारखानदारांनी एमआयडीसीकडे पैशाचा भरणा केला आहे. ज्या कारखानदारांनी पैसे भरले नाहीत, अशा कारखानदारांना सोमवारपासून नोटीस बजावणार असल्याची माहिती एमआयडीसीचे अधिकारी दीपक बोबडे पाटील यांनी दिली.>प्रदूषणाला कारणीभूत घटकांवर लवकरच कारवाईतळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी धाव घेतली आहे. ही याचिका दाखल झाल्यापासून एमआयडीसीमधील अधिकारीवर्गावर लवादाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. सीईटीपी प्रशासनालाही कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही. हा निर्णय लवकरच येणार असून प्रदूषणाला कारणीभूत घटकांवर कारवाई होईल, अशी आशा म्हात्रे यांनी व्यक्त केली.