डाएट करणारेही चाखणार दिवाळीत फराळाची चव

By Admin | Updated: November 7, 2015 03:47 IST2015-11-07T03:47:56+5:302015-11-07T03:47:56+5:30

सणासुदीच्या दिवसात मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या गाठीभेटीत चार घास जरा जास्तच खाल्ले जातात. बदलती जीवनशैली, बैठे काम तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे पदार्थ

Dietetic taste will be used in Diwali | डाएट करणारेही चाखणार दिवाळीत फराळाची चव

डाएट करणारेही चाखणार दिवाळीत फराळाची चव

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई
सणासुदीच्या दिवसात मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या गाठीभेटीत चार घास जरा जास्तच खाल्ले जातात. बदलती जीवनशैली, बैठे काम तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे पदार्थ तसेच गोडाचे पदार्थ असलेल्या दिवाळीच्या फराळाच्या ताटापासून लांब राहिलेलेच परवडते. असे असतानाही वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीच्या सणाला आरोग्याला हितकारक फराळाची चव चाखता येणेही अगदी सोपे झाले आहे. बाजारात आलेल्या डाएट फराळामुळे हेल्थ कॉन्शियस व्यक्तींनाही फराळाचा आस्वाद घेता येणार आहे.
दिवाळीच्या फराळात तेलातुपाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये फराळ तयाराना विशेष काळजी घेतली जाते. बाजारात डाएटचे पदार्थ मिळू लागल्याने डाएट करणाऱ्यांसाठी या आॅईल फ्री फराळाचा पर्यायाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना आपल्या प्रकृतीक डेदुर्लक्ष होता कामा नये यासाठी बाजारात मिळणाऱ्या डाएट फराळाबरोबरच शुगर फी मिठाईदेखील बाजारात उपलब्ध आहे. डाएट फराळाचा खप दिवसेंदिवस वाढत आहे. या फराळाच्या किमती २० टक्क्यांनी जास्त असूनही त्याची विक्री तेजीत असल्याची माहिती विक्रेत्या आरती शिर्के यांनी दिली. शहरातील दुकाने, मॉल्समध्येही डाएट फराळ उपलब्ध असून एका किलोसाठी ७०० ते १००० रुपये मोजावे लागतात. महिला गृहोद्योग, बचत गट यांनीही यंदा मागणीनुसार डाएट फराळ बनविले असून १००-१५० रुपयांना लहान पॅकेटमध्ये हे फराळ सर्वच बाजारपेठेत उपलब्ध आहेत. डाएट फराळामध्ये कमी कॅलरीज असलेल्या करंज्या,गव्हाचे पौष्टिक लाडू, नाचणीचे लाडू, मेथी-पालक शंकरपाळे या पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

Web Title: Dietetic taste will be used in Diwali