शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या निधीतून इतरांचाच विकास

By admin | Updated: January 5, 2016 01:02 IST

गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

बिर्लागेट : गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींच्या विकासाकरिता असलेल्या निधीतून भलत्याच ठिकाणी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या योजनेत आदिवासींच्या वाड्यावस्त्यांना स्थान आहे किंवा कसे, असा सवाल केला जात आहे.राज्यातील आघाडी सरकारने २००८-०९ मध्ये आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठक्कर बाप्पा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत ११ कामे निश्चित केली आहे. यामध्ये सिमेंट रस्ते, समाजमंदिर, शाळा, कम्पाउंड, विहिरी दुरुस्ती, नळयोजना, स्मशानभूमी, व्यायामशाळा, गटारे, शौचालये आदी कामांचा समावेश असून आदिवासी समाजाची ५० टक्के लोकवस्ती असली तरी त्या वाडीवस्तीवर या योजना राबवाव्यात, असे सरकारी आदेशात म्हटले होते.कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने अथवा पाणीपुरवठा विभागाने मागील तीन वर्षांत एकही योजना राबविली नाही. विशेष म्हणजे तालुक्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या १८ ते २० हजारांच्या आसपास असताना कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केळणी येथे आदिवासी योजनेतून चक्क गावात रस्ता तयार केला. असेच प्रकार इतरही गावांत झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.कित्येक वाड्यावस्त्यांवर रस्ते, लाइट, पाणी, शाळा नाहीत, तर या नागरिकांना रेशनकार्ड, घरपट्टी, जातीचे दाखले अशी महत्त्वाची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गोरगरीब दलित, आदिवासींच्या योजना अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे भलत्याच ठिकाणी राबविल्या जात आहेत, असे आदिवासी समाजातील लोकांचे म्हणणे आहे.