शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रासाठी रंगीबेरंगी घटांना मागणी

By admin | Updated: October 13, 2015 01:40 IST

नवरात्रोत्सवात लागणारे घट पूर्णत्वास गेले असून त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या फिती, एम्ब्रॉयडरीच्या फिती, टिकल्या,

भाग्यश्री प्रधान, ठाणेनवरात्रोत्सवात लागणारे घट पूर्णत्वास गेले असून त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या फिती, एम्ब्रॉयडरीच्या फिती, टिकल्या, कुंदन, चौकोनी व गोलाकार छोटे-मोठे आरसे, मणी, खडे आदी सजावटीच्या साहित्याने ते सजवले गेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या घटांची किंमत ५ ते १० टकक्यांनी वाढली असून कारागीर तसेच सजावटीच्या साहित्यातही २-३ रुपये वाढ झाल्याने हे घट महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर, धारावी तसेच ठाणे-कल्याण कुंभारवाड्यांत मात्र ५० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत विविध घट उपलब्ध आहेत. यातील काही घट गुजरातवरूनही आणले जातात आणि त्यानंतर या साध्या घटांवर कलाकुसर केल्याने त्यांची किंमत वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या घटाला गरबा असेही संबोधले जाते. रात्रीच्या वेळी या गरब्याच्या छिद्रातून पडणाऱ्या मंद प्रकाशातून देवी आशीर्वाद देते, अशी समजूत असल्याने त्यांना बाजारात अधिक मागणी आहे. काही घरांमध्ये नवरात्रीच्या दिवसांत या सजवलेल्या घटांभोवती मुली फेर धरतात व तो डोक्यावर घेऊन नृत्य करतात. म्हणून या नृत्याला गरबा हे नाव पडले आहे. यातील काही घटांवर अ‍ॅक्रॅलिक कलरचा वापर करून फुले, पाने तसेच शुभचिन्ह अशी नक्षीदार डिझाइनही काढले जाते. पूर्वी लाल रंगाचाच घट वापरण्याची पद्धत होती. मात्र, आता केशरी, पिवळा, गुलाबी या रंगांच्या घटांनाही बाजारात मागणी आहे. या वर्षी काही घटांना एका बाजूने उघडण्यासाठी दार असून त्यामुळे दिव्यामध्ये सहजरीत्या तेल घालण्याकरिता याचा उपयोग होत असल्याने गिऱ्हाइकांची या घटाला मागणी वाढली आहे. हे सुबक व सुंदर घट बनविण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच ५० टक्के नफा होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.