शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी-युतीचे निर्णय तालुुका पातळीवर होणार

By admin | Updated: January 9, 2015 22:59 IST

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणार का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणार का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. मात्र पक्षीय पातळीवर भाजपाची कोंडी करण्यासाठी सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा प्रयत्न जिल्हा पातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांनी आघाडी आणि युतीचा निर्णय घेण्याचे आदेश भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत युतीची शक्यता दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणूकीत ठाणे जिल्ह्यात भाजपाला मिळालेले यश हे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना चांगलाच बोचत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचयात समितीच्या निवडणुकीतही भाजपाने आपला दबदबा कायम ठेवल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपाचे हे यश अडचणीचे ठरणार आहे. भाजपाची ताकद ग्रामीण भागात वाढू न देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रयत्न करित आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीबाबत अद्याप निर्णय होत नाही. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या पदाधिका-यांच्या एकत्रित गुप्त बैठका सुरु आहेत.
या बैठकांमध्ये केवळ भाजपाला कसे रोखावे हाच एकमेव मुद्दा पुढे येत आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीबाबत जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश पक्षाने दिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्रित येऊ न भाजपाला रोखण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीचा निर्णय हा केवळ जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याची वेळ आल्यावर घेतला जाणार आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरुन युतीचे आदेश आल्यास जागा वाटपाचा घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा विचार सुरु असून ग्रामीण भागात भाजपाला उभारी देण्याची आणि भाजपाची ताकद अजमावण्याची संधी या निवडणुकीत मिळणार आहे.
तर दुसरीकडे पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणत्या पक्षासोबत आघाडी करावा ह निर्णय घेण्याचे अधिकार सर्वच पक्षांच्या तालुका पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहे. तालुका पातळीवर जी परिस्थिती असले त्या प्रमाणे त्यांनी आघाडी किंवा युती करावे असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेने या तिन्ही पक्षांनी दिले आहेत. त्यामुळे तालुका पातळीवर आघाडी आणि युती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

चर्चेला दुजोरा; मात्र अंतिम निर्णय अद्याप नाही
४शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत चर्चेबाबत राष्ट्रवादीच्या एका प्रदेश सरचिटणीसांना विचारले असता त्यांनी नाव न सांंगण्याच्या अटीवर या अंतर्गत चर्चेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पातळीवर या संदर्भात चर्चा सुरु असून अंतिम निर्णय अद्याप झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.