शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांत दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 27, 2017 03:34 IST

ट्रान्स हार्बर मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातांत ठार झालेल्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातांत ठार झालेल्यांमध्ये एका २२ वर्षीय तरु णीचा समावेश आहे. तुर्भे रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र मांक-२वर शनिवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या पहिल्या अपघातात ५२ वर्षीय ओमप्रकाश सीताराम सिंग यांचा मृत्यू झाला. टिटवाळा येथे राहणारे सिंग वाशीतील एका रोडवेज कंपनीत काम करत होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे कामावरून सुटल्यानंतर ते घरी जाण्यासाठी तुर्भे रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक-२वर लोकल पकडण्यासाठी आले होते. मात्र, लोकल सुटल्यानंतर सिंग यांनी धावत लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते फलाटावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जखम होऊन ते गंभीर झाले. या वेळी त्यांना महापालिकेच्या वाशी येथील रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर रविवारी जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या दुसऱ्या अपघातात २२ वर्षीय चैत्राली रामदास गलांडे या तरुणीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. जुईनगर येथील पारसमणी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या चैत्रालीने नुकतेच आपले फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. रविवारी सकाळी कुर्ला येथे आपल्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी चैत्राली रेल्वे रु ळ ओलांडून जुईनगर रेल्वे स्टेशनवर येत असताना, भरधाव लोकलची तिला धडक लागली.