शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर पडलेल्या मास्कमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:03 IST

पनवेलमधील स्थिती : संसर्ग वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : कोविड संक्रमणाचा  प्रभाव वाढत आहे. त्याबाबत पनवेल परिसरातील नागरिक  योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न वापरणे, त्याचबरोबर वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट न लावता  रस्त्यावर फेकणे आदी गोष्टींमुळे परिसरात कोरोना संसर्गाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. याबाबत  महापालिकेकडून  उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.कोविड संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायझर व मास्कचा वापर प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मेडिकल तसेच बाजारात सॅनिटायझर तसेच मास्कची मागणी वाढली आहे. पनवेल परिसरात दररोज पन्नासपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत आहेत. मंगळवारपर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात ५३२ जणांना, तर ग्रामीण भागात १६२ जणांना कोरोना झाला आहे.  दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी बीट मार्शलची नेमणूक करण्यात आली असली तरी  कारवाई कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.  बाजारपेठेतील  गर्दी, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे तसेच शहरात नागरिकांकडून मास्क रस्त्यावर फेकले जात आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गात वाढ होण्यास  भर पडत आहे.  पर्यावरण तज्ज्ञाच्या मते मास्कचा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होतो. त्याची विल्हेवाट शास्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे; परंतु तसे  नागरिकांकडून गांभीर्याने हाताळले जात नाही. शहरात कुठेही पडलेले मास्क,  हातमोजे दृष्टीस पडत आहेत. 

मी जबाबदार …. नागरिकांना स्वत:ची काळजी स्त:च घ्यावी लागणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत कोरोनावर मात करता येऊ शकते . त्याकरिता नागरिकांकडून नियमाचे पालन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात येत आहे.  प्रत्येकवेळी प्रशासनावर जबाबदारी ढकलणे योग्य नाही.  लोकांनीसुद्धा स्वत: जबाबदारी घेतली पाहिजे. इतरत्र मास्क फेकू नये  , सोशल डिस्टन्सिंग ,  सॅनिटायझरचा वापर करण्याचे महापालिका प्रशासनाकडून  सांगण्यात आले आहे.