शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नाकाकामगारांवर आली उपासमारीची वेळ, पनवेलसह नवी मुंबईतील नाके ओस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:28 IST

नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात.

- अनंत पाटील, वैभव गायकर नवी मुंबई, पनवेल : कोरोनाचा सर्वाधिक फटका नाकाकामगारांना बसू लागला आहे. पनवेलसह नवी मुंबईमधील प्रमुख नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावली आहे. भीतीमुळे अनेकांनी कामावर येणेच थांबविले असून, जे नाक्यावर येतात त्यांच्या हातालाही रोजगार मिळेनासा झाला आहे. ‘आमच्या हातावर सॅनिटायझर नको, काम हवे, तोंडाला मास्क नको, पोटभर अन्न हवे,’ अशा प्रतिक्रिया कामगार व्यक्त करत आहेत.नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात. काही वेळेला  कामगारांची संख्या वाढत असते. कोरोनाची साथ पसरू लागल्यापासून बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. नागरिकांकडून सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे, यामुळे घरांची दुरुस्ती, रंगकाम व इतर कामे थांबविण्यात आली आहेत. मोठ्या बांधकामाच्या ठिकाणचीही अनेक कामे थांबविण्यात आली आहेत, यामुळे पहाटे ७ पासून दुपारी २ वाजेपर्यंत नाक्यावर थांबले तरी कामच मिळत नाही. अनेकांना दिवसभर काम केले, तरच घरखर्च चालविता येतो. काही कामगार पुलाखाली व झोपडपट्टीमध्ये राहतात. कामच नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम मिळत नसल्यामुळे नाक्यावर येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. प्रमुख नाक्यावर दररोज एक हजार ते १५०० कामगार उभे असायचे, आता २० ते २५ कामगार काम मिळेल या आशेने बसतात. मात्र, काम न मिळाल्याने निराश होऊन त्यांना घरचा रस्ता पकडून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची खंत घणसोली येथील नाकाकामगार हरिभाऊ कांबळे यांनी व्यक्त केली.कोरोनामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसाय आर्थिक मंदीत आल्यामुळे आम्हाला कोणी काम देत नाही. सरकारने या विषाणूची लागण होऊ नये म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे, त्याचे स्वागत करतो. मात्र, हातावर पोट असलेल्या कामगारांनी जायचे कुठे? अशी प्रतिक्रि या जनार्दन शिंदे या नाकाकामगाराने दिली.

शहरातील बांधकाम व्यवसायावरही झाला परिणामकोरोनाचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. नवीन बांधकामे, दुरुस्ती व इतर कामे जवळपास ठप्प असून याचा फटका पनवेलमधील नाकाकामगारांनाही बसला आहे. पनवेल शहरात मिडलक्लास सोसायटी परिसरात रस्त्यावरच हे नाकाकामगार नेहमी थांबत असतात. पनवेल परिसरात कोणत्याही प्रकारची कामे असल्यास संबंधित कंत्राटदार या ठिकाणी येऊन संबंधित कामगारांना घेऊन जात असतात. नजीकच्या आठवडाभरात कंत्राटदारांनी या नाक्याकडे पाठ फिरविल्याचे म्हणणे आहे. सर्व साइट बंद असल्याने या नाक्यावरील कामगारांना ताटकळत उभे राहवे लागत आहे. कोरोनासारख्या घातक विषाणूच्या फैलावामुळे अनेकांनी आपली कामे बंद केली आहेत.आम्ही जायचे कुठे?गावाकडे हाताला रोजगार मिळत नसल्याने शहरात आलो. नाक्यावर उभे राहून मिळेल ते काम करत आहे. रोजच्या रोजंदारीवरच घरखर्च भागत असून पैसे साठवून गावाकडे पाठवावे लागत आहेत. येथेही काम मिळणे मुश्कील झाल्याचे जायचे कुठे, अशी प्रतिक्रिया रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केली आहे.कामच नाही तर खायचे काय?खारघर शहरातील सेक्टर १२ मधील नाक्यावरील कामगारांनाही काम मिळेनासे झाले आहे. आठवडाभरापासून कामावर मोट्या प्रमाणात फरक पडल्याचे रमेश राठोड या कामगाराने सांगितले. नाक्यावर महिलांना ५०० व पुरु षांना ७०० रुपये हजेरी मिळत असते. मात्र, कामच नसल्याने एखादा कंत्राटदार त्या ठिकाणी आलाच तर तोट्यात जाऊन आम्हाला काम करावे लागत आहे. सुशिक्षित नागरिक घरी बसून काम करू शकतात. मात्र, हातावर पोट असल्याने आम्ही काय करायचे, कामच नसेल तर खायचे काय? असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई