शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गॅसवाहिनीचे काम पूर्ण

By admin | Updated: October 26, 2015 01:07 IST

सिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीसिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. इतर ठिकाणी खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी खाडी प्रवण क्षेत्रात कांदळवनांमुळे अनेक अडचणी येत होत्या. कांदळवने वाचविण्यासाठी कोपरा खाडीच्या खालून पाइपलाइन ‘ट्रेज लेस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे कांदळवनांची हानी टळली आहे. त्यामुळे लवकरच सिडको वसाहतीतील रहिवाशांना पाइपद्वारे गॅस पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पनवेलची लोकसंख्या साडेआठ लाखांवर पोहचली आहे. याठिकाणी होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महानगराच्या दृष्टीने शहराची वाटचाल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पैकी पाइपलाइनव्दारे गॅस पुरवठा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईत याच प्रकारे पाइपलाइनव्दारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातो. सिडको वसाहती आणि पनवेल शहराला गॅस पुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडव्दारे पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरुवातीला खारघर वसाहतीपर्यंत गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेडुंगपर्यंत विस्तारण्यात आल्या. मात्र खारघर आणि कळंबोली या दरम्यान असलेल्या कोपरा खाडी व आजूबाजूला कांदळवन असल्याने त्या पट्ट्यातील काम थांबले होते. मात्र या ठिकाणी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एलीटी मशिनच्याव्दारे ट्रेज लेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याकरिता जिप्सम स्ट्रक्चर या कंपनीला नियुक्त केले होते.तळोजा लिंक रोडच्या लगत पॉइंट तयार करून या ठिकाणाहून ड्रिलिंगव्दारे काम करण्यात आले आहे. गॅसवाहिनी जमिनीखाली टाकण्यात आल्याने फुटण्याचा अथवा गळतीचा धोका नाही. तांत्रिक बिघाड झाला तरी त्याचा परिणाम या पट्ट्यात होणार नाही तशी यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर कांदळवनाचा ऱ्हास न होता पाइपलाइन टाकण्यात आली आहे. खोली जास्त असल्याने झाडांच्या मुळाला कोणतीही इजा पोहचणार नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञ तारिक बिलाल म्हणाले.