शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बसडेपोतील खड्ड्यांनी प्रवासी हैराण

By admin | Updated: July 8, 2017 06:03 IST

शहरातील बसडेपोला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. या खड्ड्यांनी प्रवासी आणि बसचालक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील बसडेपोला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. या खड्ड्यांनी प्रवासी आणि बसचालक त्रस्त झाले आहेत. पावसाळ््यापूर्वी पालिका प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी केल्याने ऐन पावसाळ्यात या ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झाले असल्याने प्रशासनाचा दिखाऊपणा उघडकीस आला आहे. खड्डे बुजविण्यासाठी केलेला खर्च खड्ड्यात गेला असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रवासी, चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डेपोतील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने बेस्टच्या वाहनचालकांच्या अतिघाईमुळे हे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. याबाबत तक्र ारी करूनही बेस्ट प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बेस्टच्या डेपोमध्ये काँक्रिटीकरण व डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्ते बनविताना कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याने डेपोतील रस्ते लगेच खराब होत आहेत. बसडेपोत आल्यानंतरही बेस्टचे वाहनचालक बस वेगात चालवत असतात. त्यामुळे खड्ड्यांतील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सीबीडी बसडेपोमध्ये खड्ड्यांच्या समस्येने प्रवासी हैराण झाले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी काही खड्ड्यांमध्ये खडी टाकून डांबराचा मुलामा चढवला आहे, तर काही ठिकाणी पेव्हरब्लॉक रचले आहेत. पावसामुळे डांबर वाहून गेले आहे. पेव्हरब्लॉक खड्ड्यातून उखडले असल्याने तीच परिस्थिती कायम राहिल्याने या कामासाठी केलेल्या महानगरपालिकेचा खर्च खड्ड्यांत गेला आहे. पाऊस नसला तरी या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना यातून मार्ग काढणे कठीण होते. डेपो परिसरात सध्या पुन्हा पावसामुळे खड्डे पडल्याने त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज चालकांना अनेकदा येत नाही. खड्ड्यांत अचानक बस गेल्याने प्रवासी पुढील आसनावर किंवा खिडक्यांवर आदळण्याचे प्रकार घडतात. तसेच खड्ड्यांतील साचलेले पाणी बाजूला बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना अंगावर झेलावे लागते.