नवी मुंबई : नवी मुंबईतील मॅनेजमेंट कोर्समधील तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या लोकमत माध्यम प्रायोजक ‘अॅबस्ट्रॅक्ट - २०१५’ चा मंगळवारपासून शुभारंभ झाला. वाशीतील फादर अॅग्नेल महाविद्यालय तसेच केएआरआरएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसांच्या या महोत्सवात विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे ११ वे वर्ष असून यावर्षीची या संकल्पना ‘प्रिझम आॅफ पॉसिबिलिटीज’ यावर आधारित आहे. विद्यार्थ्यांमधील व्यवस्थापनाचे कौशल्य पारखण्यासाठी या महोत्सवात विविध मॅनेजमेंट गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याद्वारे भविष्यात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असणारी वैचारिक पातळी, काम करण्याचे कौशल्य, नवनवीन कल्पना या सर्वच गोष्टींची परीक्षा खेळाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. महोत्सवासाठी मुंबईतील ६० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले असून बी-प्लॅन, अॅड-मॅड, डान्स फ्युजन, रॉकिंग बँड यासारखे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व अल्विन सल्दान्हा, प्रिन्सेस आॅफ वाईन म्हणून ओळख असलेल्या अचला जोशी, संस्थेच्या सह संचालिका डॉ. सुजाता चिंचोलकर आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील मॅनेजमेंटचे विद्यार्थी अभिषेक शेट्टी, प्रीती चंद्रशेखर या दोघांनी या संपूर्ण महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली आहे. बुधवारी वैचारिक खेळांबरोबरच मैदानी खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे. रिंक फुटबॉल, ब्लफमास्टर, मॉक - स्टॉक, शटरबग्ज अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अॅबस्ट्रॅक्ट’ महोत्सवाला सुरुवात
By admin | Updated: September 30, 2015 00:17 IST
नवी मुंबईतील मॅनेजमेंट कोर्समधील तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या लोकमत माध्यम प्रायोजक ‘अॅबस्ट्रॅक्ट - २०१५’ चा मंगळवारपासून शुभारंभ झाला
‘अॅबस्ट्रॅक्ट’ महोत्सवाला सुरुवात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}