शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सुकापूरमधील बारवर पोलिसांची धाड

By admin | Updated: October 1, 2015 23:52 IST

एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या सुकापूर येथील एसबी नाईट या

पनवेल : एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या सुकापूर येथील एसबी नाईट या कुंटणखान्यावर खांदेश्वर पोलिसांनी बुधवारी रात्री धाड टाकून मालकासह तेथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींसह अशा २० जणांवर कारवाई केली. सुकापूर येथे एसबी नाईट हा बार व लॉजिंग आहे. याठिकाणी बारच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच एका मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले असल्याची तक्र ार देखील पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे बुधवारी रात्री ९ च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सप्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याठिकाणी धाड टाकून अनैतिक व्यापार प्रतिबंधक नियमानुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर ठिकाणावरून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अटक करण्यात आली असून मालक व आणखी एक जण फरारी आहे. अटक करण्यात आलेल्या महिला नवी मुंबई परिसरातील आहे. कारवाईत २६ हजार ५०० रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई हे करीत आहेत. पनवेलमध्ये लॉजिंगच्या नावाखाली देहव्यापार सुरु आहे. लेडीज बारचे परमीट असलेल्या बारमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंतच महिला वेटर्सना काम करण्याची परवानगी असली तरी त्याचे सर्रास उल्लंघन होऊन उशिरापर्यंत बारमध्ये महिलांचा राबता असतो. पनवेल परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. मोठ्या प्रमाणात पैसा मिळाल्याने अनेक तरुण बार संस्कृतीकडे आकर्षिले जात आहेत. तसेच पुण्याकडून देखील अनेक दौलतजादे याठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. अशाप्रकारे फोफावणाऱ्या अनैतिक व्यवसायाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)