शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणासाठी बँकेची मदत

By admin | Updated: December 14, 2015 01:26 IST

राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीच्या ठिकाणी चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्यात येणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागराष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीच्या ठिकाणी चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्यात येणार आहे. एकूण नऊ गावांपैकी फक्त अलिबाग तालुक्यातील किहीम गावातील जागेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये जागतिक बँक या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य देणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारही आर्थिक पाठबळ उभे करणार आहे. उरण, मुरुड, म्हसळा आणि श्रीवर्धन येथेही केंद्र उभारण्यासाठी जागेचे सर्वेक्षण पतन विभागाने सुरू केले आहे.देशातील सर्वच किनारपट्टीच्या गावांमध्ये चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या स्तरावरून सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी जोमाने सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चांजे, पनवेल-विचुंबे, अलिबाग-किहीम आणि गोंधळपाडा, मुरुड, मुरुड- हिफीजखार, म्हसळा- खारसाई, श्रीवर्धन अशा नऊ ठिकाणी चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्याबाबत प्रस्तावित होते. मात्र निकषामध्ये अलिबाग- किहीमची जागा बसली आहे. किनारपट्टीवर अशी चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारायची असून किती असावीत याला बंधन नाही. आवश्यकतेनुसार एकाच गावात ती दोनही असू शकतात, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगतीचा टप्पा एवढा गाठला आहे, की ७२ तास आधी चक्रीवादळाची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या आपत्तीचे चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन करून मोठ्या संख्येने होणारी जीवित आणि वित्तहानीची तीव्रता कमी करण्यास सोपे जाणार आहे. चक्रीवादळ निवारण केंद्रासाठी जागतिक बँक ७५ टक्के निधी देणार आहे. राज्य सरकार २५ टक्के खर्च उचलणार आहे. केंद्र उभारुन झाल्यानंतर ते संबंधित ग्रामपंचायतीला हस्तांतरित केले जाणार असल्याचे पाठक म्हणाले. केंद्र उभारण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हा पतन अभियंता विजय जावीर यांनी स्पष्ट केले.