शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अवधूत तटकरेंचा राजीनामा

By admin | Updated: December 12, 2015 01:46 IST

येथील नगराध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत अनिल तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

रोहा : येथील नगराध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत अनिल तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आमदार झाल्यानंतर अवधूत तटकरे यांनी नगराध्यक्षपद सोडले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांत नाराजी होती.नगरसेवकांनी अवधूत तटकरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली पुन्हा सुरु केल्या होत्या. राजीनामा देण्यासाठी नगरसेवकांच्या वाढत्या दबाबामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. हे वृत्त रोह्यात येताच नगराध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरु झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.रोह्याचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर रोह्यातील अनेक इच्छुक पुरुष व महिला नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली होती. मात्र आ.अवधूत तटकरे यांनी राजीनामा देण्याबाबत कोणतीही अनुकूलता न दर्शविल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा देखील प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराज नगरसेवकांची समजूत काढल्याने अविश्वास ठरावाचे नाट्य पूर्णत्वास जाऊ शकले नाही. काही दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अवधूत तटकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी राष्ट्रवादीतील विरोधी नगरसेवकांनी हालचाली सुरु केल्या होत्या. या गोष्टीची कुणकुण अवधूत तटकरे यांना लागताच त्यांनी जिल्हाधिकारी शीतल तेली - उगले यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समजते, यामुळे लवकरच रोहा नगरीला तटकरे कुटुंबियांव्यतिरिक्त नगराध्यक्ष काही काळासाठी लाभणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन अवधूत तटकरे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याची देखील चर्चा आहे. इच्छुक नगरसेवकांनी आपल्या नावाची शिफारस व्हावी यासाठी मोर्चेबांधणी चालू केली आहे.(वार्ताहर)