शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये नियुक्तीपेक्षा दुप्पट कामगारांची हजेरी; कामगारांच्या बोगस नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 07:26 IST

नेरुळचे अहिल्याबाई होळकर सेंटर : या प्रकरणात ठेकेदारांसोबत काही अधिकाऱ्यांचेही हात गुंतले असल्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष  आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोविड सेंटरमध्ये नेमलेल्या कामगारांपेक्षा दुप्पट कामगारांची हजेरी लावल्याची बाब उघडकीस आली आहे. या फुगीर भरतीच्या माध्यमातून आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच कोविड सेंटर्समधील कामगारांच्या भरतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेकेदारांमार्फत कामगार भरती करण्यात आलेली आहे. सुरुवातीला तेरा ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, रुग्णसंख्या घटू लागल्याने नोव्हेंबरमध्ये केवळ चार सेंटर चालू ठेवून उर्वरित सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. त्यापैकी नेरुळ सेक्टर ९ येथील अहिल्याबाई होळकर सेंटरमध्ये नोकर भरतीच्या आडून पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत हाउसकीपिंगसाठी १५ कामगार व तीन सुपरवायझर नेमण्यात आले होते. या कामगारांकडून तीन पाळीमध्ये काम करून घेतले जात होते. यामुळे एका पाळीला पाच कामगार व एक सुपरवायझर हजर असायचा. तशी त्यांची नोंदही रोजच्या रोज ठेवली जात होती. मात्र, पालिकेकडे सादर करण्यात आलेल्या नोंदीमध्ये एका पाळीला १२ ते १५ कामगार दाखविण्यात आले आहेत. प्रत्येक कामगारामागे मिळणारे १५ ते १८ हजार रुपये वेतन लाटण्यासाठी हा प्रयत्न झाल्याची शक्यता असून त्याकरिता हजेरी पटावर बोगस कामगारांच्या नोंदी झाल्याचा आरोप  आहे. इतरही कोविड सेंटरमध्ये बोगस नोंदी झालेल्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चालू असलेले केंद्र व बंद करण्यात आलेल्या केंद्राच्या ठिकाणची ठेकेदारामार्फत झालेली नोकरभरती तपासण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात ठेकेदारांसोबत काही अधिकाऱ्यांचेही हात गुंतले असल्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष  आहे.

अधिकाऱ्यांवर अंकुश नाहीकोविड नियंत्रणासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याकरिता पुरेसा निधी उपलब्ध केला जात आहे. पालिकेच्या तिजोरीतील निधीही आवश्यकतेप्रमाणे मिळत आहे. सध्या पंचवार्षिक कालखंड संपून लोकप्रतिनिधींची पदे बरखास्त असल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचा अंकुश नाही. याचा फायदा घेऊन अधिकारी मर्जीतल्या ठेकेदारांना पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे. यातूनच कामगारांच्या बोगस नोंदीमधून मलिदा लाटली जात आहे. 

ठेकेदाराला निश्चित रकमेवर ठेका दिलेला आहे की प्रती कामगारप्रमाणे दिलेला हे तपासले जाईल. प्रती कामगाराप्रमाणे ठेका घेऊन जर हजेरीवर ज्यादा कामगारांची नोंद दाखविली असेल, तर ते गैर आहे, याबाबत चौकशी केली जाईल. - संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस