अटल सेतू, कोस्टल रोड विमानतळाला जाेडणार! वाहतुकीला मिळणार नवी दिशा; CRZची मंजुरी

By नारायण जाधव | Updated: January 20, 2026 09:30 IST2026-01-20T09:28:20+5:302026-01-20T09:30:37+5:30

यामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि राजधानी मुंबई यांच्यातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत करणार आहे.

Atal Setu, Coastal Road to connect to the airport! Traffic will get a new direction; CRZ approval | अटल सेतू, कोस्टल रोड विमानतळाला जाेडणार! वाहतुकीला मिळणार नवी दिशा; CRZची मंजुरी

अटल सेतू, कोस्टल रोड विमानतळाला जाेडणार! वाहतुकीला मिळणार नवी दिशा; CRZची मंजुरी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू प्रकल्पाने मोठा दिलासा मिळालेला असताना आता या सेतूला आपल्या  कोस्टल रोडशी जोडण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याच अंतर्गत गव्हाण गावातील शिवाजीनगर इंटरचेंजवर सिडको सहा रॅम्प बांधणार आहे. यामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि राजधानी मुंबई यांच्यातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत करणार आहे.

अटल सेतू प्रकल्प आखला जात असताना सिडकोचे कोस्टल रोडचे बांधकाम सुरू नव्हते. मात्र, आता सिडकोने कोस्टल रोडच्या कामाला गती दिल्यामुळे शिवाजीनगर कनेक्टरद्वारे आवश्यक लिंकेज पूर्ण करण्यासाठी सहा रॅम्पची उभारणी होणार आहे. त्यांना सीआरझेड प्राधिकरणाने अटी-शर्तींवर मंजुरी दिली असून तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

रेल्वेची कनेक्टिव्हिटी हाेणार मजबूत

प्रकल्पाचे स्थान न्हावा रोड आणि उरण रोडद्वारे चांगले जोडलेले आहे. हे कनेक्शन खारकोपर रेल्वेस्थानकाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करेल. जेव्हा हे सहा रॅम्प पूर्ण होतील, तेव्हा जेएनपीटी व मुंबई, चिर्ले आणि नवी मुंबई विमानतळातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. रायगड जिल्ह्याच्या नागरिकांनासुद्धा अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईला येणे-जाणे अधिक सोपे होईल.

खारफुटीची ९३६ झाडे होणार बाधित

९३६ खारफुटी झाडे बाधित होणार आहेत. परंतु, ईआयए अहवालानुसार, खारफुटीची हानी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. हा प्रकल्प सुमारे ३.५ हेक्टर क्षेत्र व्यापत आहे व यासाठी ३२ स्ट्रक्चरल मॉड्यूलचा समावेश असून, ७५ मीटर लांबीचे आहेत. स्पॅन १.० मीटर व्यासाच्या बोर कास्ट-इन्सिटू पाईल्सवर आधारलेले असतील, ज्यात दीर्घकालीन स्ट्रक्चरल मजबुतीसाठी अंतर्निहित खडकात पुरेसे सॉकेटिंग असेल.

Web Title : अटल सेतु कोस्टल रोड, एयरपोर्ट से जुड़ेगा; यातायात को मिलेगी नई दिशा

Web Summary : अटल सेतु कोस्टल रोड से शिवाजी नगर इंटरचेंज पर छह रैंप के माध्यम से जुड़ेगा, जिससे मुंबई, नवी मुंबई एयरपोर्ट, जेएनपीटी, उरण और पनवेल के बीच यातायात सुगम होगा। सीआरजेड प्राधिकरण ने परियोजना को मंजूरी दी, पर्यावरण मंत्रालय को भेजा। इससे कनेक्टिविटी और पहुंच में सुधार होगा।

Web Title : Atal Setu to Connect Coastal Road, Airport; New Traffic Direction

Web Summary : Atal Setu will connect to the coastal road via six ramps at Shivaji Nagar interchange, facilitating smoother traffic between Mumbai, Navi Mumbai Airport, JNPT, Uran, and Panvel. CRZ authority approved the project, forwarding it to the environment ministry. This will significantly improve connectivity and accessibility.