शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

अमुल दुधात आढळले झुरळ

By admin | Updated: January 10, 2015 22:34 IST

अमुल कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कमलराज वालिया या ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनासह मीरा रोड पोलिसांना अर्जाद्वारे केली आहे.

भार्इंदर : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गुजरातच्या अहमदाबाद येथील अमुल दूध डेअरीच्या अमुल गोल्ड नामक दुधाच्या अर्धा लीटर सीलबंद पिशवीत झुरळ आढळल्याने याप्रकरणी अमुल कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कमलराज वालिया या ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनासह मीरा रोड पोलिसांना अर्जाद्वारे केली आहे.
येथील गोकूळ व्हिलेज गृहसंकुलातील ग्रीन पार्क इमारतीत राहणारे वालिया यांनी ४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास परिसरातील नारायण मिल्क सप्लाय या दूध विक्रेत्याकडून अमुल गोल्ड (बॅच क्र. केव्ही०५०४१५५एए) नामक अर्धा लीटर दुधाची पिशवी खरेदी केली होती. त्या पिशवीतले दूध काढण्यापूर्वीच त्यांना त्यात झुरळ आढळून आल्याने त्यांनी ही बाब दूध विक्रेत्याच्या निदर्शनास आणून दिली. हा प्रकार अमुल डेअरीत थडकल्यानंतर त्याच दिवशी दु. २ वा.च्या सुमारास अमुल डेअरीतून काही व्यक्ती वालिया यांच्या घरी आल्या. त्यांनी त्यांच्याकडे त्या पिशवीची मागणी करून त्यांना तक्रार न करण्यासाठी काही आमिषे दाखविण्यात आली. परंतु, त्याला बळी न पडता त्यांनी ६ जानेवारी रोजी या विरोधात ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रीतसर तक्रार अर्ज दाखल केला. त्या वेळी तेथील कर्मचाऱ्याने ती पिशवी कार्यालयात जमा करून त्याची तेथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येईल, असे वालिया यांना सांगितले. त्यावर वालिया यांनी अविश्वास दाखवून त्या पिशवीचा रीतसर पंचनामा करून ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेतच तपासणीसाठी पाठविण्याची मागणी केली. ती अमान्य करण्यात आल्याने वालिया यांनी ८ जानेवारी रोजी मीरा रोड पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. परंतु, अद्याप या प्रकरणावर गांभीर्य दाखविण्यात आले नसून नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या कंपन्यांकडे शासकीय यंत्रणा हितसंबंधामुळे कारवाई करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या ती पिशवी त्यांनी फ्रीजरमध्ये ठेवली आहे. (प्रतिनिधी)