तीन ठिकाणी दारू विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:52 IST2020-03-29T20:51:42+5:302020-03-29T20:52:06+5:30

नवी मुंबई - परिमंडळ एक च्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 30 हजार ...

Action on liquor dealers in three places | तीन ठिकाणी दारू विक्रेत्यांवर कारवाई

तीन ठिकाणी दारू विक्रेत्यांवर कारवाई

नवी मुंबई - परिमंडळ एक च्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 30 हजार रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. 

परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांच्या पथकांमार्फत शहरातील अवैध धंद्यावर कारवाई केली जात आहे. यादरम्यान कोपर खैरणे गाव, बेलापूर गाव, तसेच एपीएमसी आवारात चालणाऱ्या अवैध देशी दारूच्या अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार देवडे यांच्या पथकाने त्याठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. यामध्ये 30 हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

तर दारू विक्री प्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात कोपर खैरणे, एनआरआय तसेच एपीएमसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action on liquor dealers in three places