शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पंचशीलनगर येथील गाळ्यांवर कारवाई

By admin | Updated: July 15, 2017 02:32 IST

नवीन पनवेल येथील रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पंचशीलनगर या झोपडपट्टीत असलेल्या व्यावसायिक गाळ्यांवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : नवीन पनवेल येथील रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पंचशीलनगर या झोपडपट्टीत असलेल्या व्यावसायिक गाळ्यांवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली. येथील व्यावसायिक गाळे पालिकेने बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी झोपडीच्या जागी व्यावसायिक गाळे बांधण्यात आले होते.स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट पनवेलसाठी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम शुक्र वारी नवीन पनवेल येथे धडकली. आयुक्तांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असली तरी लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित नव्हते. पंचशीलनगर येथे अनेक उच्चभ्रू लोकांनी व्यावसायिक गाळे विकत घेतले होते. त्याशिवाय येथील घरांना व्यापारी गाळ्यांचे स्वरूप देण्यात आले होते. प्रत्येक घर आणि व्यापारी गाळ्याची शहानिशा करून महापालिकेने ही कारवाई केली. या गाळ्यांमध्ये मच्छी विक्री, गॅरेज, मटणाची दुकाने, पक्षांची कार्यालये थाटण्यात आली होती. जवळपास ६० ते ७० गाळ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नवीन पनवेल येथील रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या पंचशील नगर या झोपडपट्टीत शेकडो व्यावसायिक गाळे बनविण्यात आले होते. काही नागरिकांनी कारवाईचे संकेत मिळताच आधीच गाळे खाली केले होते, तर काही गाळे चालकांनी व्यवसाय बंद करून गाळ्याला कापड व पत्रे मारले होते. काहींनी गाळ्यांवर विटांचे बांधकाम करून गाळे बंद केले होते. मात्र याला न जुमानता पालिकेने कारवाई केली व येथील गाळे जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान उपायुक्त जमीर भिंगरेकर, सहआयुक्त भगवान खाडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे हे उपस्थित होते.