शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

६ ग्रामपंचायती तंटामुक्त

By admin | Updated: February 15, 2015 00:25 IST

रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रोहा : रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये खैरेखुर्द, न्हावे, मालसई, पुई, तांबडी, चिंचवली तर्फे आतोणे यांचा समावेश आहे. या प्रसंगी बोलताना वाळीत प्रकरणांमध्ये अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. प्रशासन गावकी प्रथेच्या विरोधात नाही परंतु गावकीतून वादविवाद होण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबविले जावेत, असे मत पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे, रोहा तहसिलदार उर्मिला पाटील उपस्थित होते. यावेळी धुमाळ म्हणाले की, रोहा तालुक्यातील जनतेने मागील निवडणुका व सणवार यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित ठेवण्यात हातभार लावला आहे. कोकण रेल्वेच्या दुर्घटनेनंतर रोहा तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन कौतूक करण्यात आले आहे. परंतू आपल्या तालुक्याला वाळीत प्रकरणांचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पांडुरंग कोंड, संजय मांडलुस्कर, उत्तम नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दिनेश कदम, एपीआय भागवत, महिला पोलीस उपनिरीक्षक निरभवणे, पालांडे यांच्यासह पोलीस स्टाफ व पारितोषिक प्राप्त गावातील नागरिक, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

च्रोहा तालुक्यातील गाव पोलीस पाटील या ंना पोलीस पाटील वह्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील यांनी गावात येणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नोंद पुस्तिकेत घ्यावी.
च्आपल्या गावामध्ये घडणाऱ्या लहान सहान घटना तसेच किरकोळ वाद याची देखील नोंद ठेवून संबंधित माहिती पोलीस ठाण्यापर्यंत पोहचवावी.
च्माहितीचे आदान प्रदान झाल्यास गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात यश मिळू शकेल असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे पाटील यांनी व्यक्त केले.

रोहा तालुका वाळीत मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे जेथे स्वच्छता आणि शांतता असते तेथे लक्ष्मी नांदते. यामुळेच प्रत्येकाने तंटामुक्त गाव याबरोबरच आपला गाव स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- उर्मिला पाटील,
रोहा तहलिदार.