हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:25 PM2023-05-04T14:25:31+5:302023-05-04T14:27:41+5:30

प्रसिद्ध युट्युबर अगस्त चौहान बाईक पळवताना व्हिडिओ काढत होता.

Youtuber agastya chauhan died in accident on yamuna express way | हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू

हायवेवर ताशी 300km च्या स्पीडने पळवली बाईक, प्रसिद्ध युट्युबरचा अपघातात जागीच मृत्यू

googlenewsNext


YouTuber accident: उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात एका प्रसिद्ध युट्युबरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलिगढमधील टप्पल पोलिस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा YouTuber ताशी 300 किलोमीटर वेगाने आपली सुपर बाइक चालवत होता. यादरम्यान दुचाकी डिव्हायडरला धडकली. 

प्रसिद्ध यूट्यूबर अगस्त्य चौहान आपल्या रेसिंग बाइकवरुन आग्राहून दिल्लीला जात होता. यादरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि बाईक दुभाजकावर आदळली. युट्युबरने हेल्मेट घातले होते, पण अपघात एवढा बीषण होता की, अगस्त्यचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

YouTuber दिल्लीचा रहिवासी होता
मृत अगस्त्य चौहान हा दिल्लीचा रहिवासी होता. तो 'PRO RIDER 1000' नावाने यूट्यूब चॅनल चालवायचा. यावर तो आपल्या बाईकसह दैनंदिन आयुष्यातील व्हिडिओ टाकायचा. त्याच्या चॅनेलवर 10 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. अगस्त्य बाईक चालवताना प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असे. तो आपल्या व्हिडिओमध्ये लोकांना वेगाने गाडी न चालवण्याचा इशाराही द्यायचा.

बाईक 300 च्या स्पीडने पळवली...
अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर 300 च्या वेगाने रेसिंग बाइक चालवत होता, यावेळी त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले. यावेळी त्याची बाईक डिव्हायडरला धडकल्याने अगस्त्यचा मृत्यू झाला. अगस्त्य दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होता. विशेष म्हणजे, अगस्त्य बाईक चालवताना व्हिडिओही बनवत होता.

 

Web Title: Youtuber agastya chauhan died in accident on yamuna express way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.