'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 04:24 PM2024-05-18T16:24:36+5:302024-05-18T16:26:46+5:30

Karishma Kapoor : १९९६ साली करिश्मा कपूर आणि आमिर खानच्या 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

Aishwarya Rai was the first choice for 'Raja Hindustani', not Karisma Kapoor, the actress rejected the film due to this reason | 'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

बॉलिवूडची लोलो म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) ही तिच्या काळातील सर्वात हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा अभिनय इतका जबरदस्त होता की प्रत्येक घरात तिची वेगळी ओळख निर्माण झाली. आजही तिच्या कारकिर्दीत सर्वाधिक हिट चित्रपट देणारी ती तिसरी अभिनेत्री आहे. या वर्षी मार्चमध्ये रिलीज झालेल्या 'मर्डर मुबारक' या चित्रपटात ती दिसली होती. करिश्माच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहित नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रंजक गोष्ट सांगणार आहोत ऐश्वर्या राय(Aishwarya Rai)च्या एका चुकीमुळे करिश्मा कपूरचे नशीब फळफळले. 

१९९६ साली करिश्मा कपूर आणि आमिर खानच्या 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. रिपोर्ट्सनुसार, ५.७५ कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जवळपास ७६.३४ कोटी रुपयांची कमाई करून खळबळ उडवून दिली होती. या ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपटाने करिश्माला टॉप अभिनेत्रींपैकी एक बनवले होते. मात्र, याआधी तिच्याकडे 'प्रेम कैदी', 'अनारी', 'राजा बाबू', 'कुली नंबर 1', 'साजन चले ससुराल' आणि 'जीत' सारखे चित्रपट असले तरी 'राजा हिंदुस्तानी'मधून तिला वेगळी ओळख मिळाली. 

राजा हिंदुस्तानीमुळे करिश्माची बदलली इमेज
या चित्रपटापूर्वी करिश्माचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकले नाही. काही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला करिश्माच्या लूकवरून तिला खूप ट्रोल केले गेले होते. लोक तिला लेडी रणधीर कपूर म्हणायचे पण जेव्हा 'राजा हिंदुस्तानी' आला तेव्हा करिश्माची इमेज पूर्णपणे बदलली. ऐश्वर्या रायने नाकारल्यानंतर हा चित्रपट तिला मिळाला.

करिश्माच्या आधी ऐश्वर्या रायला दिली होती चित्रपटाची ऑफर
अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की 'राजा हिंदुस्तानी'च्या निर्मात्यांनी आधी ऐश्वर्या रायशी संपर्क साधला पण नंतर तिने चित्रपटाची ऑफर नाकारली. कारण त्यावेळी ती तिचं शिक्षण घेत होती. तिने नकार देताच करिश्मा कपूरला हा चित्रपट ऑफर करण्यात आला आणि तिची वेगळी ओळख निर्माण झाली. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर ही तिसरी बॉलिवूड अभिनेत्री आहे जिच्या नावावर सर्वाधिक हिट चित्रपट आहेत.

Web Title: Aishwarya Rai was the first choice for 'Raja Hindustani', not Karisma Kapoor, the actress rejected the film due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.