काँग्रेस विरोधी पक्षनेत्याविना

By Admin | Updated: May 23, 2014 00:18 IST2014-05-23T00:18:19+5:302014-05-23T00:18:19+5:30

लोकसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेत्याचा कॅबिनेट दर्जा मिळणार नाही.

Without opposition Congress leaders | काँग्रेस विरोधी पक्षनेत्याविना

काँग्रेस विरोधी पक्षनेत्याविना

हरीश गुप्ता, नवी दिल्ली - लोकसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेत्याचा कॅबिनेट दर्जा मिळणार नाही. विरोधी पक्षनेतेपद स्वत: सोनिया गांधी स्वीकारणार की कमलनाथ किंवा वीरप्पा मोईली यांच्याकडे जबाबदारी सोपविणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. कमलनाथ यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वीरप्पा मोईली यांच्यासाठी लॉबिंग होत असले तरी ते स्वीकारार्ह ठरण्याची शक्यता नाही. ५४५ सदस्यीय लोकसभेत १० टक्के म्हणजे ५५ खासदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मान मिळतो. त्यानुसार कॅबिनेट दर्जा दिला जातो. नवे लोकसभाध्यक्ष काँग्रेसला हा मान देण्याची शक्यता नाहीच. १९७१ आणि ८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भाजप किंवा माकपला कॅबिनेट दर्जा दिला नव्हता कारण या पक्षांचे संख्याबळ १० टक्क्यांपेक्षा कमी होते, अशी माहिती लोकसभेचे माजी महासचिव आणि घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यांनी दिली. १९८४ मध्ये काँग्रेसने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तेव्हा भाजपला अवघ्या दोन तर माकपला केवळ २२ जागा मिळाल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कोणत्याही पक्षाला मुख्य विरोधी पक्षनेतेपद दिले नव्हते.

Web Title: Without opposition Congress leaders