शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विकासाला गती देणार -१

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

नागपूरचा विकासाला गती देणार गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : नागपूरसारख्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) इंडियन इन्स्टट्यिूट मॅनेजमेंट यासारख्या संस्था येत आहे. मिहान प्रकल्पानेही आता वेग धरला असून नागपूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून विकासाला गती देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...


नागपूरचा विकासाला गती देणार
गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर :
नागपूरसारख्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) इंडियन इन्स्टट्यिूट मॅनेजमेंट यासारख्या संस्था येत आहे. मिहान प्रकल्पानेही आता वेग धरला असून नागपूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून विकासाला गती देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मौजा वाठोडा शेषनगर येथे नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त श्याम वर्धने, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, नागपूरकरांचे स्वप्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. विकासाच्या दृष्टीने गतिशील आणि पारदर्शी निर्णय सरकारने घेतले आहे. आता उद्योग येणे शक्य होणार आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्यामुळे उद्योग विस्ताराचे परवाने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. नासुप्रने पहिल्या टप्प्यात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी १० हजार घरे बांधावीत. मागासवर्गीयांसह पोलीस व सफाई कामगारांच्या घरांसाठी सुद्धा वाढीव चटईक्षेत्र देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लकडगंज येथील जागेवर पोलीस वसााहत निर्माण करता येईल. चांगली कामे व्हावीत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधारणा करण्यात येत आहे. चार्टर्ड आर्किटेक्टला प्लॅन मंजूर करण्याचे अधिकार देण्यात येईल. मात्र हे अधिकार देतांना चुकीचे काम केल्यास सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूदसुद्धा करण्यात येईल. शहरातील अनधिकृत लेआऊटमधील लोकांची घरे नियमित झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येईल. झोपडपट्टीवासीयांना पट्टेवाटपाची योजना तयार केली असून झोपडपट्टीतील व्यक्तींना सुद्धा मालकी हक्काचे पट्टे देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.