शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 04:38 IST

mann ki baat News : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असून, त्यासाठी आणखी पावले भविष्यात उचलणार आहोत. यंदाच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेला नेत्रदीपक विजय ते राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान अशा अनेक घटनांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. त्यांनी सांगितले की, देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत १५ दिवसात ३० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात भारताने अनेक देशांना मदत केली आहे. 

औषधे, लसींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला यंदा प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांपैकी आपापल्या भागातील स्वातंत्र्यसेनानींबद्दल युवा पिढीने लेखन करायला हवे, पुस्तके लिहायला हवीत.  जालन्याच्या डॉ. मंत्रींचा ‘मन की बात’मध्ये उल्लेखमोदी यांनी ‘मन की बात’मध्ये जालन्याचे डॉ. स्वप्नील मंत्री यांचा उल्लेख केला. मंत्री म्हणाले की, “मी मोदी यांना रस्ते आणि महिलांच्या सुरक्षेवर सूचना आणि घोषणा पाठवल्या होत्या. या सूचनांच्या आधारे पंतप्रधानांनी आज लोकांना रस्ते सुरक्षेवर आवाहन केले हा अभिमानाचा मुद्दा आहे.”

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी