शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कोण असणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष? नाव ठरलं, फक्त घोषणा बाकी; पंतप्रधान मोदींच्या पसंतीवर पक्षाची मोहर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:07 IST

खरे तर, भाजपच्या राष्ट्रीय निवड समितीची बैठक डॉ. के. लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र दौऱ्यावरून नुकतेच परतले आहेत. यानंतर, आता भारतीय नजनता पक्ष लवकरच आपल्या नव्या अध्यक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजप लवकरच आंतरिक निवड समितीची बैठक घेऊन अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख निश्चित करू शकतो. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी, एका केंद्रीय मंत्र्याचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. हे पक्षातील एक मजबूत नेते तथा पंतप्रधान मोदींच्याही अगदी जवळचे मानले जातात.

निवडणुकीच्या तारखेवर अंतिम निर्णय -खरे तर, भाजपच्या राष्ट्रीय निवड समितीची बैठक डॉ. के. लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीच्या तारखेसंदर्भातही अंतिम निर्णय घेतला जाईल. या समितीमध्ये बी.एल. संतोष आदी नेतेही उपस्थित असतील. 

मनोहर लाल खट्टर यांचे नाव जवळपास नश्चित - माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. महत्वाचे म्हणजे, 90 टक्के खट्टर हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत, असा दावा पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या दोघांचाही खट्टर यांच्यावर विश्वास आहे. खट्टर यांच्याकडे संघटनात्मक अनुभवही दांडगा आहे. तसेच ते दीर्घकाळ संघ प्रचारकही राहिले आहेत.

1977 पासून संघाचे कार्यकर्त्ये -मनोहर लाल खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या ते करनालचे खासदार आहेत. ७१ वर्षीय खट्टर हे १९७७ पासून संघाशी जोडले गेले आहेत आणि १९९४ पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींसह हरियाणातही संघटना मजबूत करण्याचे काम केले. दरम्यान, जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्येच संपला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण