West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:09 IST2026-05-04T11:04:15+5:302026-05-04T11:09:04+5:30
West Bengal Election Results 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज (०४ मे २०२६) मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज (०४ मे २०२६) मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. राज्याची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जींच्या हाती जाणार की भारतीय जनता पक्ष इतिहास घडवणार, याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. ममता बॅनर्जी या विजयी घौडदौड सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच,भाजपने यावेळी तृणमूलला जोरदार टक्कर देत सत्तापरिवर्तनाचा चंग बांधला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात बंगालमध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता. १९५२ मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून १९७७ पर्यंत काँग्रेसने आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र, १९७७ मध्ये बंगालमध्ये मोठा राजकीय बदल झाला. ज्योति बसू यांच्या नेतृत्वाखाली सीपीआयएम सत्तेत आले. त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सलग ३४ वर्षे सत्ता राखण्याचा विक्रम केला, जो देशातील कोणत्याही राज्याचा प्रदीर्घ काळ राहिलेला शासनकाळ आहे. २०११ मध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सीपीआयएम मोठा धक्का देत बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. तेव्हापासून ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची संपूर्ण यादी:
| मुख्यमंत्र्यांचे नाव | कालावधी | पक्ष |
| प्रफुल्ल चंद्र घोष (पहिला कार्यकाळ) | १५-०८-१९४७ – २२-०१-१९४८ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| विधान चंद्र रॉय | २३-०१-१९४८ – ०१-०७-१९६२ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| प्रफुल्ल चंद्र सेन | ०१-०७-१९६२ – २८-०२-१९६७ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| अजय मुखर्जी (पहिला सत्र) | ०२-०३-१९६७ – २१-११-१९६७ | बांगला काँग्रेस |
| राष्ट्रपतींचे शासन | २१-११-१९६७ – २५-०२-१९६९ | - |
| अजय मुखर्जी (दुसरा कार्यकाळ) | २५-०२-१९६९ – १६-०३-१९७० | बांगला काँग्रेस |
| राष्ट्रपतींचे शासन | १९-०३-१९७० – ०२-०४-१९७१ | - |
| अजय मुखर्जी (तिसरा कार्यकाळ) | ०२-०४-१९७१ – २८-०६-१९७१ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (विलिनीकरणानंतर) |
| राष्ट्रपतींचे शासन | २९-०६-१९७१ – १९-०३-१९७२ | - |
| सिद्धार्थ शंकर रे | २०-०३-१९७२ – ३०-०४-१९७७ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
| ज्योती बसू | २१-०६-१९७७ – ०६-११-२००० | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय-एम) |
| बुद्धदेव भट्टाचार्जी | ०६-११-२००० – १३-०५-२०११ | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय-एम) |
| ममता बॅनर्जी (पहिला कार्यकाळ) | २०-०५-२०११ – २६-०५-२०१६ | ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (एआयटीसी) |
| ममता बॅनर्जी (दुसरा कार्यकाळ) | २७-०५-२०१६ – २०-०५-२०२१ | ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (एआयटीसी) |
| ममता बॅनर्जी (तिसरा कार्यकाळ) | ०३-०५-२०२१ – आजपर्यंत | ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (एआयटीसी) |
गेल्या काही वर्षांत भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर येत भाजपने तृणमूलसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आपली सत्ता राखण्यात यशस्वी होऊन सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील? की ३४ वर्षांनंतर सीपीआयएमला हटवणाऱ्या बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट होऊन भाजप नवा राजकीय इतिहास लिहिणार का? या प्रश्नांचे उत्तर आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.