शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

West Bengal Election 2021 : TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हिपॅट; अधिकाऱ्यांचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 9:25 AM

निवडणूक आयोगानं केली कारवाई, एका अधिकाऱ्याचं निलंबन

ठळक मुद्देनिवडणूक आयोगानं केली कारवाई, एका अधिकाऱ्याचं निलंबनयापूर्वी आसाममध्येही घडला होता असा प्रकार

पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. याचदरम्यान हावडा येथील उलूबेरिया नॉर्थमध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्याघरी ईव्हिएम मशीन आणि व्हिव्हिपॅट सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. उलूबेरिया उत्तरमधून असलेले भाजपचे उमेदवार चिरेन बेरा यांनी आरोप केला की तुलसीबेरियाचे टीएमसी नेता गौतम घोष यांना लोकांनी ईव्हिएम आणि ४ व्हिव्हिपॅटसह पकडलं. त्यानंतर परिसरात तणाव पसरला असंही ते म्हणाले. त्यानंतर केंद्रीय दल आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांवर लाठीमारही करावा लागला. या घटनेनंतर गौतम घोष यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुरुवातीच्या तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशिनपैकी वाटत असल्याचं सांगितलं. परंतु या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि याचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. या घटनेनंतर एका अधिकाऱ्याचं निलंबनही करण्यात आलं आहे. यापूर्वी आसाममध्येही घडला होता असा प्रकारयापूर्वी आसाममध्येही असा प्रकार घडला होता. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या गाडीतून ईव्हिएम मशीने नेण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होतं. तसंच या घटनेनं मतदानसाठी असलेल्या ईव्हिएमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे आणि कायदा व्यवस्थेवरही प्रतिकूल प्रभाव टाकला असल्याचं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१EVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस