हुगळी: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूलच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. तर ममता यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गेल्या काही दिवसांत बंगालचे दौरे केले आहेत.राजकीय वातावरण तापलं असताना आता पक्षांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेचा दर्जा घसरू लागला आहे. काल तृणमूलच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर आज भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये वादग्रस्त घोषणाबाजी केली. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या रॅलीमध्ये या घोषणा देण्यात आल्या. 'देश के गद्दारों को गोली मारो ***को' अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. हुगळीतल्या चंदननगरमध्ये शुभेंदु अधिकारी यांचा रोड शो होता.
VIDEO: देश के गद्दारो को, गोली मारो ***को; भाजपच्या रोड शोमध्ये वादग्रस्त घोषणा
By कुणाल गवाणकर | Updated: January 20, 2021 18:28 IST
भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांच्या रॅलीमध्ये घोषणाबाजी
VIDEO: देश के गद्दारो को, गोली मारो ***को; भाजपच्या रोड शोमध्ये वादग्रस्त घोषणा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}