शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

व्हायरल! केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 7:15 PM

चेहऱ्यावर पांढरा रंग अन् संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असलेली ही गाय एकदम 'क्युट' दिसत आहे.

नवी दिल्ली - जगातील सर्वात लहान गायीचे वजन 4.5 किलोग्रॅम भरले आहे. या गायीला पाहून वैद्यकीय पथकही हैराण झाले आहे. कारण, या गायीचे वजन कमी असूनही ही गाय शारिरीकदृष्ट्या स्वास्थ असल्याचे वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. जगातील ही सर्वात लहान गाय नेटीझन्ससाठी आश्चर्य बनले असून फेसबुकवर #LilBill या हॅशटॅगने या गायीचे फोटो शेअर करण्यात येत आहेत. चेहऱ्यावर पांढरा रंग अन् संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असलेली ही गाय एकदम 'क्युट' दिसत आहे.

अमेरिकेतील मिसीसिपी येथे ही सर्वात लहान गाय आढळून आली आहे. विशेष म्हणजे एका मांजरीएवढे या गायीचे वजन असल्याने ही गाय चर्चेचा विषय बनली आहे. सध्या ही गाय मिसीसिपी स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ व्हेटर्नरी येथे ठेवण्यात आली आहे. गायीचे वजन पाहून त्या गायीचे मालक चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी गायीला संबंधित जनावरांच्या दवाखान्यात नेले. पण, तेथून या गायीला वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेण्यात आले. गायीच्या तपासणीनंतर ही गाय शारिरीकदृष्ट्या फीट आणि तंदुरूस्त असून केवळ वजन कमी असल्याचे तेथील पथकाने स्पष्ट केलं. अमेरिकेतील जनावरांच्या तज्ञ डॉक्टरांनी जेव्हा या गायीला जगासमोर आणले, तेव्हा नेटीझन्सकडून या गायीला गोंजारण्यात येऊ लागले. म्हणजेच, या छोट्याशा गो-माताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात येऊ लागले. तर, आमच्यासाठी ही अत्यंत दुर्मिळ केस असून या गायीचे वजन पाहून आम्हीही हैराण झालो होतो, असे वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण गायींपेक्षा या गायीचे वजन दहापट कमी आहे. फेसबुकवर या गायीचा पहिला फोटो येताच, नेटीझन्सकडून या गायीचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला आहे. काही वेळांतच #LilBill हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी आप-आपल्या क्रिएटीव्ह कॅप्शनसह या लहान गायीचे फोटो शेअर केले आहेत. तर, अनेकांनी लव्ह, क्यूट असे स्माईली देत या गायीसोबत आपले प्रेम व्यक्त केले आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या गायीवर निगराणी ठेवणाऱ्या वैद्यकीय पथकानेही गायीचे अपटेड क्षणाक्षणाला देणार असल्याचे नेटीझन्सला सोशल मीडियातूनच सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी तीन पायांची गाय, पाच पायांची गाय किंवा दोन मुखी गाय असे गायीचे प्रकार पाहण्यात आले आहेत. मात्र, केवळ 10 पाऊंड म्हणजेच 4.5 किलो ग्रॅम वजनाची गाय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.   

टॅग्स :cowगायAmericaअमेरिकाMedicalवैद्यकीय