vikas dubey got four bullets in body three at chest and one at hand | 3 छातीत, 1 हाताला; एन्काऊंटरमध्ये 4 गोळ्या लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता विकास दुबे

3 छातीत, 1 हाताला; एन्काऊंटरमध्ये 4 गोळ्या लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता विकास दुबे

ठळक मुद्देचकमकीदरम्यान विकासला चार गोळ्या लागल्या.गोळी विकासच्या कमरेवर लागल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या छातीत लागलेल्या गोळ्या स्पष्टपणे दिसत होत्या.

कानपूर - कानपूर शूटआउटमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येतील मुख्य आरोपी विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरनंतर विकासला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कानपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, चकमकीदरम्यान विकासला चार गोळ्या लागल्या. यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या  त्याचे शवविच्छेदन सुरू आहे.

मेडिकल कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. आरबी कमल यांनी सांगितले, की विकास दुबेला मृतावस्थेतच हॅलट रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांना त्याच्या शरिरात चार गोळ्या सापडल्या. यापैकी तीन गोळ्या त्याच्या छातीत तर एक गोळी त्याच्या हाताला लागली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वी एन्काऊंटरनंतर पोलिसांनी आपल्या निवेदनात सांगितले होते, की विकास दुबे पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जात होता. यावेळी त्याला सरेंडर करण्यासाही सांगण्यात आले. मात्र, त्याने ऐकले नाही. म्हणून त्याला रोखण्यासाठी गोळी चालवावी लागली. यावेळी गोळी त्याच्या कमरेवर लागल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र, जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या छातीत लागलेली गोळी स्पष्टपणे दिसत होती.

असा पकडला गेला होता विकास दुबे -
विकास दुबे नेमका कसा पकडला गेला, त्याला कशी अटक झाली, याच्या तीन थिअरी आहेत. त्याच्या अटकेसंदर्भात, त्याला कधी पुजाऱ्याने ओळखले, तर कधी सुरक्षा रक्षकाने ओळखले, असे सांगण्यात येते. 

पोलिसांच्या थिअरीत फूल विकणारा-
माध्यामांनी दिलेल्या वृत्तांनुसार, उज्जैनचे डीएम आशीष सिंह यांनी म्हटले आहे, की आज सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास, एका संशयित व्यक्तीला महाकाल मंदिर परिसरात पाहिले गेले. त्याने दर्शनासंदर्भात सुरेश नावाच्या एका दुकानदाराकडून माहिती घेतली आणि पुजेचे सामान विकत घेतले. यावेळी त्याने तोंडाचे मास्क काढताच दुकानदाराला त्याचा संशय आला. यानंतर दुकानदाराने तत्काळ सुरक्षा रक्षकाला माहिती दिली. खासगी सुरक्षा रक्षक एका पोलिसासोबत महाकाल मंदिराच्या कॅम्पसमध्ये गेला. कॅम्पसमधेच त्याला पकडण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही. यानंतर त्याला महाकाल येथील चौकीवर आणण्यात आले. पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे समजताच विकास दुबेनेच स्वतःची ओळख सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या -

ना सुरक्षा रक्षक, ना पुजारी; मंदिरात नेमकं कुणी ओळखलं विकास दुबेला? पोलिसांनी सांगितली अशी 'थिअरी'

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vikas dubey got four bullets in body three at chest and one at hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.