कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 03:46 PM2020-07-08T15:46:44+5:302020-07-08T15:58:53+5:30

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने युद्धाच्या संकटाचा इशारा दिला आहे. अमेरिकेचा दबाव स्वीकारत वृत्तपत्राने म्हटले आहे, अमेरिका जगातील मोठ्या राष्ट्रांतील संबंध खराब करत आहे.

या वृत्तपत्रने म्हटले आहे, अमेरिका जगातील मोठ्या देशांमध्ये विरोधाचे वातावरण निर्माण करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि जागतीकी करणावर विपरित परिणाम होतील.

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, अमेरिका आपल्या फायद्यासाठी भीषण जियोपॉलिटिकल (भूराजकीय) टूलचा वापर करत आहे. अमेरिका चीनबरोबरचा वैचारिक वाद एका भयानक पातळीवर घेऊन जात आहे. कारण अमेरिकेकडे आपल्या सहकारी देशांना चीनविरोधात उभे करण्याचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे.

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, ज्या देशांसोबत चीनचा सीमावाद आहे, त्या सर्व देशांना अमेरिका समर्थन देत आहे. एवढेच नाही, तर अशा देशांना चीनविरोधी भूमिका घेण्यासाठीही अमेरिका प्रोत्साहन देत आहे. एवढेच नाही, तर चीनला सहकार्य करू नका यासाठी अमेरिका इतर देशांच्या लोकांनाही तयार करत आहे.

अमेरिका आपला प्रभाव मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याच्या या प्रयत्नांची किंमत जगाला चुकवावी लागेल. पश्चिमेकडील आणि इतर काही देशांना अमेरिका आपल्या बाजूने यायला सांगत आहे.

चीनचा बाजारही जवळपास अमेरिके एवढाच आहे आणि जवळपास 100 देश चीनचे व्यापारी भागिदार आहेत. यामुळे जगाचे नुकसान होईल आणि जगाला याची किंमत दीर्घकाळ मोजावी लागेल, असे ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे.

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की कोरोना महामारीची ही पहिलीच लाट आहे. यामुळे जगाला दीर्घकाळ नुकसान सोसावे लागणार आहे. मात्र, अमेरिका या महामारीकडे केवळ दोनच दृष्टीने पाहत आहे. एक म्हणजे, अमेरिकेत येणाऱ्या निवडणुका आणि दुसरे म्हणजे, आंतरराष्ट्रीय भूराजकीय हालचाली.

चीनी सरकारचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या वृत्त पत्राचे म्हणणे आहे, की कोरोनासंदर्भात अमेरिकेत वैज्ञानिक दृष्टिकोणाची कमतरता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यात मोठा अढथळा निर्माण झाला. अमेरिका आणि चीनने एकत्रितपणे यावर कम केले असते, तर कोरोनाने एवढे गंभीर रूप घेतले नसते.

अमेरिकेने उचललेल्या पावलांमुळे आगामी काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची स्थिती बदलेल. आम्ही कदाचित, अशा वळणावर जात आहोत, जेथे अघिक द्वेश असेल आणि युद्धाचे संकट असेल आणि अनेक देश चिंताग्रस्त असतील, असे चीनी वृत्तपत्राने म्हटले आहे.